सोलापूर, दि.१६ : सरपंच आरक्षण हरकतींवर झालेल्या सुनावणीनंतर निकाल देण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी उच्च न्यायालयाकडून आणखी सहा दिवस मुदतवाढ मागितली आहे.

आठ तालुक्यातील 22 ग्रामपंचायतीच्या सरपंच आरक्षणाविरोधात तक्रारी आहेत यापूर्वी आठ तालुक्यातील सतरा ग्रामपंचायतीच्या हरकती होत्या आता त्या 22 वर गेल्या आहेत. सरपंच आरक्षण सोडतीच्याविरोधात काही गावांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

त्या याचिकेवर उच्च न्यायालयाने संबंधित तालुक्यातील सर्व सरपंच निवडी थांबविण्यात येऊन हरकतींवर सुनावणी झाल्यानंतर निवडी करण्यात याव्यात जिल्हाधिकारी यांनी सर्व हरकतींवर सुनावणी घेऊन निर्णय घ्यावा,असे आदेश दिले होते.त्यावर आता अजून निकाल देण्यासाठी सहा दिवसाची मुदत मागितली आहे.