आनंदाचा व काव्याचा खळखळता चिरतरुण झरा– डॉक्टर विजयकुमार खुने उर्फ विजू दादा
पहाटे बार्शी-आगळगाव रोडवर दररोज न चुकता एक हसमुख ,सतेज, ताजेतवाने 58 वर्षाचा एक युवक फिरण्यास आलेला दिसतो तेच म्हणजे डॉक्टर विजयकुमार खुणे उर्फ विजू दादा.

डोक्यावर थंडीपासून बचाव करण्यासाठी घातलेली टोपी, नाकाला लावलेला ,रुमाल अंगात टी-शर्ट व स्पोर्ट पॅन्ट, पायात शूज, तब्येतीला शोभेल असे हातात रुबाबदार कडे,निर्मळ ,सतेज ,गोरेगोमटे व्यक्तिमत्व, चेहऱ्यावर नेहमी स्मितहास्य व पाहिल्यावर वाटणार नाही हे व्यक्तिमत्व 58 वर्षे वयाचे असेल असे निगर्विष्ट व नम्र व्यक्तिमत्व म्हणजेच सर्वांचे लाडके विजू दादा..
विजू दादा हे पेशाने डॉक्टर परंतु साहित्यक्षेत्रातील एक शीघ्र कवी म्हणून सुद्धा त्यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. विजू दादांचा दिनक्रम म्हणजे दररोज पहाटे बार्शी–आगळगाव रोड वर पाच ते सात किलोमीटर चालणे. सुर्योदयासोबत दररोज एक कवितेची चारोळी व्हिडिओबद्ध करणे व ती सर्वांना व्हाट्सअप व फेसबुकच्या माध्यमातून शेअर करणे. मग त्यांच्या कवितेच्या चारोळ्या आरोग्य,समाजकारण, सांस्कृतिक अर्थकारण,राजकारण ,सण ,समारंभ अशा लहान मोठ्या पासून सर्वांच्या मनाचा ठाव घेणार्या असतात व या चारोळीच्या शेवटी ठरलेलं वाक्य म्हणजे आनंदी राहा विजू दादा.
म्हणजेच काय हा डॉक्टर 58 वर्षाचा तरुण सर्वांना बरे करण्याबरोबर आनंदी राहण्याचा आरोग्यमंत्र जोपासत वयाच्या 58 वर्षात सुद्धा स्वतः प्रात्यक्षिक रित्या दररोज नियमित व्यायामाचा व कवितेचा घेतलेला वसा जोपासताना आपणास दिसतो.त्यांच्या सुर्योदया समवेत केलेल्या कवितांचे व्हिडिओ एकदम सुश्राव्य असतात.त्यातून सर्वांना उपदेशाचे डोस व आनंदी राहण्याचा मूलमंत्र दिलेला असतो. ते व्हिडिओ बार्शी तसेच परिसरात प्रसिद्ध आहेत.

सोबत इतर राज्य व परदेशातील मित्रमंडळी त्यांच्या स्लोगन चा म्हणजेच आनंदी राहा विजयदादा याचा उपयोग करून स्वतःचे व्हिडिओ काढून शेअर करीत आहेत.त्यांच्या या स्लोगन चा उपयोग लहानापासून–थोरापर्यंत ,पर्यटक, लग्नसमारंभात नवरा- नवरी शेतकरी, तरुण ,पेशंट, व्यवसायिक, खेळाडू तसेच व्यायामास येणारे व्यक्ती अतिशय आनंदी पणे स्वतःचा व्हिडिओ बनवून शेअर करीत आहेत.
विजू दादा हे समाजात आनंदी व्यक्तिमत्व आहे. त्याच सोबत ते ज्या दवाखान्यात काम करतात तेथील स्टाफला सुद्धा या कोरोणाच्या भयावह परिस्थितीत आनंदी ठेवून वातावरण हलके-फुलके ठेवतात..
अशा या विजू दादांना पुढील कार्यास आमच्याकडून हार्दिक शुभेच्छा..शेवटी एवढेच म्हणेन .मित्रांनो ,सर्वांनी आमलात आणावा विजू दादांचा आरोग्याचा मंत्र ,तरच होईल आयुष्याचे विकसित तंत्र आनंदी राहा..
लेखन—-श्री.स्वप्निल सुंदरराव तुपे Sp