बार्शी : बार्शी शहर व तालुक्यात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी व घरोघरी गणेशभक्तांनी ‘मोरया.. मोरया…गणपती बाप्पा मोरया’ च्या जयघोषात उत्साही वातावरणात वाजतगाजत आज श्री गणेशांची प्रतिष्ठापना केली. बार्शी शहरात ४५ सार्वजनिक मंडळांनी प्रतिष्ठापना केली. कोरोनाचे सावट व निर्बंध असल्याने नेहमीसारखा जल्लोष दिसला नाही.


शहरात मंगळवार पेठ, भगवंत मैदान जवळ व पाठीमागील बाजूस तसेच नवी व जुनी चाटे गल्ली, सोमवार पेठ, शासकीय विश्रामगृहाजवळ श्री गणेशांच्या मूर्तीचे स्टॉल लावण्यात आले होते. दुपारपर्यंत मुहूर्त असल्याने सकाळच्या सत्रात गणेशभक्तांनी मूर्ती घेण्यासाठी गर्दी केली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध असल्याने मोठ्या मिरवणुका निघाल्या नाहीत. शहरात ४५ मंडळांनी अधिकृत परवानगी घेतली असली तरी गल्लीबोळात अनेक मंडळांनी प्रतिष्ठापना केली आहे.
आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा