गोरगरिबांना बेड मिळण्यासाठी बार्शीत मध्यवर्ती कोविड नियंत्रण कक्ष स्थापन करा – राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी
बार्शी:बार्शी शहरात मध्यवर्ती कोविड नियंत्रण कक्ष स्थापन करून पेशंट भरती या कक्षामार्फत करावी.असे केले तरच गरीब आणि सामान्य लोकांना बेड मिळतील आणि एका हॉस्पिटल मधून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये चकरा माराव्या लागणार नाहीत अशा मागणीचे निवेदन बार्शी शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अमोल आंधळकर यांनी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने प्रांताधिकारी हेमंत निकम, मुख्याधिकारी अमिता दगडे-पाटील, तहसीलदार सुनील शेरखाने यांना हे निवेदन दिले.

तालुक्यात सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे.सदर विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनामार्फत विविध उपाययोजना रायविल्या जात आहेत.तरी देखील सदर उपाय योजना अपुऱ्या पडत आहेत.बार्शी शहर व तालुक्यात दररोज किमान ५ ते १० रुग्ण मृत्यूमुखी पडत आहेत. तसेच
बार्शी शहर व तालुक्यात दिवसेंदिवस रुग्णंची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

तसेच शेजारीलउस्मानाबाद जिल्ह्यातील रुग्ण उपचारासाठी बार्शीमध्ये येत आहेत. यार्शी शहरात व ग्रामीण भागात रुग्णांना हॉस्पिटलमध्ये बेड, ऑक्सिजन, व्हेंटीलेटर, औषधे व इंजेक्शन इत्यादी सुविधा पुरेशा प्रमाणात मिळत नसल्याने अनेक लोकांना जीव गमवावा लागत आहे. त्यासाठी मध्यवर्ती कोविड नियंत्रण कक्ष स्थापन करावा असे म्हटले आहे.
यावेळी शहराध्यक्ष अमोल आंधळकर, युवक सरचिटणीस ऍड राजशेखर गुंड पाटील, उमेश नेवाळे आणि विद्यार्थी अध्यक्ष रत्नदीप कुलकर्णी उपस्थित होते.