बार्शी शहर व तालुक्यात कोरोनाचा उद्रेक; शनिवारी 107 रुग्णांची वाढ

0
367

बार्शी शहर व तालुक्यात कोरोनाचा उद्रेक; शनिवारी 107 रुग्णांची वाढ

सहा दिवसात तब्बल 647 कोरोना बधितांची भर

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

चाचण्यांचे प्रमाण ही वाढवले 6301 जणांच्या केल्या चाचण्या

बार्शी  : राज्यात कोरोनाची वाढ जशी वेगाने सुरू आहे तशीच बार्शी शहर व तालुक्‍यातही तो झपाट्याने वाढत आहे. चाचण्यांचे प्रमाण ही वाढवले असून दररोज जवळपास 2 हजार चाचण्या घेतल्या जात आहेत. मागील तीन दिवसात शहरात 201 तर ग्रामीण भागात 142 असे 343 रुग्ण आढळून आले.तर शनिवारी ही107 रुग्ण सापडले. यात शहरात 60 आणि ग्रामीण मधील 47 जणांचा समावेश आहे .

दुसऱ्या टप्प्यात कोरोना विषाणूची वाढ काही केल्या थांबल्यास तयार नाही.मागील आठवड्यात तब्बल साडेतीनशे रुग्ण सापडल्यानंतर या आठवड्यात तर कोरोनाने वाढीचा कहर केला आहे. सोमवारी एका दिवसात तब्बल 102 रुग्ण आढळून आले. तर मंगळवारी देखील 95 रुग्ण आढळून आले. एकंदरीतच या आठवड्यातील 5 दिवसात मिळून 540 रुग्ण सापडले आहेत.अशी माहिती प्रभारी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ  एस के गायकवाड यांनी दिली.

त्यानंतर बुधवारी 130 , गुरुवारी 110,शुक्रवारी 105 रुग्ण आढळले. शनिवारी 107 ची भर पडली.या तीन दिवसात शहरात 261 आणि ग्रामीण भागातील 189 रुग्णांचा समावेश आहे.

सोमवारी शहरात 678 आणि ग्रामीण भागात 680 अँटीजेन  तर 514 आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आल्या आहेत. मंगळवारी शहरात 1056 आणि ग्रामीण भागात 501 अशा 1557 अँटीजेन चाचण्या केल्या. बुधवारी 1254, गुरुवारी 1825 तर शुक्रवारी 2010 अशा एकूण 5089 जणांच्या चाचण्या करण्यात आल्या.

शहरात अलीपुर रोड, सुभाष नगर, उपळाई रोड, नाईकवाडी प्लॉट,भीमनगर ,मंगळवार पेठ, अलीपुर रोड,पाटील प्लॉट, आदी भगत जास्त रुग्ण सापडले आहेत. तर वैराग,खांडवी,भालगाव गौडगाव, मालवंडी मध्ये जास्त रुग्ण आढळुन आले आहेत.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here