नोंदीसाठी टाळाटाळ करणाऱ्या वैरागच्या तलाठी,मंडल अधिकाऱ्याच्या विरोधात वयोवृद्ध महिलेचे तीन दिवसपासुन उपोषण

0
476

नोंदीसाठी टाळाटाळ करणाऱ्या वैरागच्या तलाठी,मंडल अधिकाऱ्याच्या विरोधात वयोवृद्ध महिलेचे तीन दिवसपासुन उपोषण

बार्शी : बार्शी दिवाणी कोर्टाचा आदेश व विक्री दाखलासह प्रत्यक्ष कब्जा देवूनही वैरागचे तलाठी  व मंडल-अधिकारी नोंद धरण्यास टाळाटाळ करत असल्याच्या कारणावरून वैराग येथील श्रीमती पार्वतीबाई दादाराव सरवदे या ७० वर्षीय वयोवृद्ध महिलेचे गेल्या तीन दिवसापासुन बार्शी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे . मात्र गेल्या तीन दिवसापासून कार्यालया संबधित कोणीही अधिकारी वा कर्मचाऱ्यांनी भेट दिली नसल्याची खंत स्वतः वयोवृद्ध महिलेने व्यक्त केली .

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा


यावेळी तहसील कार्यालयास दिलेल्या निवेदनात म्हटले की पार्वतीबाई दादाराव सरवदे या ७० वर्षीय वयोवृध्द विधवा असून  त्यांना बार्शी दिवाणी कोर्टानी मला वैराग गट नं.३८८ क्षेत्र ०४ हे.५४आर या जमिनीचा लिलाव करुन सदर महिलेला विक्री दाखला दिला आहे व प्रत्यक्ष जागेवर येवून  कोर्टाचे बेलीफांनी

ता.१५/०३/२०१९ रोजी कब्जा दिला आहे. त्याबाबत कब्जा पावती, पंचनामा झाला आहे.असे असताना सदर नमूद कागदपत्राचे नक्कला देवूनही वैरागचे तलाठी  व मंडल अधिकारी वैराग हे कोर्टाचे हुकूमाचा अवमान करुन कोणताही मनाई आदेश अस्तीत्वात नसताना नोंद धरण्यास टाळाटाळ करीत आहेत.

केवळ मंडल-अधिकारी वैराग यांनी गट नं.३८८ पैकी ५७ गुंटे क्षेत्राची नोंद नं.१२०१९

ही प्रमाणित केली परंतू त्यावर अपील झाले परंतू अपीलामध्ये कोणताही मनाई आदेश नसताना

मंडल-अधिकारी व तलाठी हे नोंद धरण्यास टाळाटाळ करीत असल्याचे म्हटले तसेच कोर्टाचे कब्जा पावती व विक्री दाखला यांना केराची टोपली दाखवून अवमान करीत असल्याचे निवेदनात म्हटले. सदर महिलेने यापूर्वीही अनेकवेळा महसुल दरबारी तक्रारी करुनही महसुल अधिकारी दबावापोटी कार्यवाही करीत नाहीत. त्यामुळे नमूद कोर्ट विक्री

दाखल्याप्रमाणे कब्जा पावती प्रमाणे गट नं.३८८ पैकी ४ हे.५४ आर क्षेत्रास नोंद त्वरीत धरावी अशी मागणी केली आहे .

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here