आठ वर्ष वयाच्या निर्भयेचा विनयभंग : आरोपीस तीन वर्ष शिक्षा व सहा हजार रुपये दंड
बार्शी, प्रतिनिधी
बार्शी येथील भराडिया प्लॉटमध्ये राहणारी आठ वर्षाची निर्भया हि तिच्या आई सोबत राहत असताना दि १५-१०-२०१७ रोजी दुपारी निर्भया ही घराचे बाहेर खेळत असताना आरोपी प्रताप उर्फ दयानंद कोंडीबा थोरवे (वय ३८) रा. रावणगाव ता. मुखेड जि. नांदेड हल्ली रा. बार्शी याने निर्भया हिस ” तू जेवलीस का?” असे विचारुन तिचा विनयभंग केल्याप्रकरणी निर्भयाच्या आईने आरोपी विरुद्ध बार्शी शहर पोलीस स्टेशन येथे भा.द.वी कलम ३५४(ब) व बालकाचे लैंगीक अपराधापासून संरक्षक अधिनियम २०१२ चे कलम १२ अन्वये गुन्हा दाखल केला होता. सदर होण्याचा तपास महिला पोलीस अधिकारी श्रीमती ठाकुर यांनी आरोपी विरुद्ध सबळ पुरावा गोळा झाल्याने त्याचे विरुद्ध दोषारोप पत्र दाखल केले.

चौकशी वेळी सरकारी पक्षाकडून एकूण ५ साक्षीदार तपासण्यात आले. सदरकामी फिर्यादी ( निर्भयाची आई), निर्भया, यांचे सुसंगत जवाब तसेच निर्भया हिने ओळख परेडच्या दरम्यान आरोपीस ओळखले या बाबी गृहीत धरुन न्या. चव्हाण, सत्र न्यायालय बार्शी यांनी आरोपीस भा.द.वि.कलम ३५४(ब) अन्वये तीन वर्ष शिक्षा व ३ हजार रुपये दंड तसेच बालकाचे लैंगीक अपराधापासून संरक्षक अधिनियम २०१२ चे कलम १२ अन्वये तीन वर्ष शिक्षा व ३ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली. सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील प्रदीप बोचरे व तत्कालीन सरकारी वकील दिनेश देशमुख यांनी काम पाहिले.

सदर प्रकरणी पोलीस निरीक्षक शेळके यांनी वेळोवेळी फिर्यादी व साक्षीदार यांना मार्गदर्शन केले.
सदर गुन्ह्याचा तपास श्रीमती ठाकूर मॅडम महिला पोलीस उपनिरीक्षक यांनी केलेला तर कोर्ट पैरवी म्हणून पोलीस हवालदार सोमनाथ जगताप यांनी काम पाहिले.