राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या पत्नीला ईडीची नोटीस
काँग्रेस नेते आणि आघाडी सरकारमधील राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या पत्नीला आता सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने चौकशीसाठी नोटीस बजावली आहे. आज सकाळी ११.०० वाजता त्या ईडी कार्यालयात जाणार असल्याची माहिती खात्रीदायक सूत्राच्या मार्फत मिळत आहे.

ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यासाठी ईडीकडून त्यांना समन्स बजावण्यात आला होता, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यानुसार त्या आज सकाळी ११.०० वाजण्याच्या सुमारास ईडी कार्यालयात जाऊ शकतात. स्वप्नाली यांचे वडील अविनाश भोसले यांच्या मालमत्ता प्रकरणी त्यांची चौकशी होणार आहे.
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांना ईडीने चौकशीसाठी नोटीस बजावली होती. आता त्या पाठोपाठ काँग्रेस नेत्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना ईडीने चौकशीसाठी नोटीस बजावली आहे. या संदर्भात मंत्री विश्वजीत कदम यांना विचारण्यात आले तेव्हा त्यांनी याविषयी बोलण्यास नकार दिला होता.

राज्यमंत्री विश्वजित कदम यांचा ईडी नोटीसीवर बोलण्यास नकार
राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी ईडी नोटीसीवर बोलण्यास नकार दिलेला आहे. यासंदर्भात मला कल्पना नसल्याचं स्पष्ट करत सध्या यावर मी बोलणार नसल्याचं विश्वजीत कदम यांनी स्पष्ट केलं.
कोण आहेत स्वप्नाली कदम …?
ठाकरे सरकारमधील मंत्री आणि काँंग्रेस नेते विश्वजीत कदम यांच्या स्वप्नाली या पत्नी आहेत तसंच काँग्रेसचे दिवंगत नेते पतंगराव कदम यांच्या सूनबाई आहेत.. तसंच पुण्यातले प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसले यांच्या त्या मुलगी आहेत.