उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यात सुरु असलेले कोरोनाचे तांडव काही केल्या कमी होत नसल्याचे दिसत आहे.जिल्ह्यात मागील महिन्यापासून कोरोनाच्या चाचण्यामध्ये वाढ झाल्यानंतर बाधित रुग्णाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. दिवसेन दिवस बाधित रुग्णाचा एकदा मोठ्या प्रमाणात वाढू लागल्यामुळे प्रशासनावर मोठा ताण आला आहे. अशा परिस्थितीमध्ये आज दिवसभरात जिल्हातील ५२५ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

आज दिवसभरात जिल्ह्यात १९२ नव्या रुग्णाची भर पडली असून ५२५ जण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. शिवाय दिसभरात ६ जणांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यन्त बाधितांची संख्या हि आता ८ हजार ४२ वर जाऊन पोहचली आहे. यापैकी ५ हजार ७५६ जण बरे होऊन घरी परतले आहेत. आणखी २ हजार ५४ कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत.
आज बाधित झालेल्या १९२ रुग्णांपैकी ११७ रुग्ण हे पीटीपीसीआर टेस्ट मध्ये ७० रुग्ण रॅपिड अँटिगन टेस्ट मध्ये व पाच रुग्ण बाहेर जिल्ह्यात पॉझिटिव्ह निघालेले आहेत. आज हि सर्वाधिक ७८ पॉझिटिव्ह उस्मानाबाद तालुक्यात तर तुळजापूर तालुका ९, उमरगा २१, कळंब ३०, परंडा ९ , लोहारा २०, भूम ३, वाशी २२ जण पॉझिटिव्ह सापडले आहेत.
आज मृत्यू मुखी पडलेल्या रुग्णामध्ये उस्मानाबाद शहरातील १ तर तालुक्यातील तेर व कामेवाडी रुग्णाचा मृत्यू झाला. तर तुळजापूर शहरातील एक महिला व वाशी तालुक्यातील घाटपिंपरी येथील एक व उमरगा तालुक्यातील गुंजोटी मधील एकाचा असे सहा जणांचे मृत्यू झाले आहेत.
……………………………..

कोरोना अहवाल
एकूण बाधित : ८०४२
बरे होऊन परतलेले एकूण रुग्ण : ५७५६
एकूण उपचाराखालील रुग्ण : २०५४
आत्तापर्यन्त मृत्यू झालेले रुग्ण : २३२