अकलुज येथे निरा नदीत बुडून 2 मुलांचा मृत्यू

0
159

अकलुज येथे निरा नदीत बुडून 2 मुलांचा मृत्यू

निरा नदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेल्या दोन अल्पवयिन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी अकलूज शहरात घडली.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अकलूज येथील महर्षि काॕलनी परिसरातील शक्ती चंद्रकांत गवळी (वय ৭६), करण रणजित लांडगे (वय १४), अवधुत हिरा कांबळे (वय १५) व भैया जगन खंडागळे (वय १६) हे चौघे दुपारी निरा नदीच्या पात्रात पोहोण्यास गेले. घाटापासून थोडे अंतर पुढे गेल्यानंतर त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही.

त्यामुळे शक्ती गवळी व करण लांडगे हे पाण्यात बुडाले. त्यांना वाचवण्याचा प्रयत्न अवधुत कांबळे व भैया खंडागळे यांनी केला. त्यांनी पात्रातून बाहेर येऊन घरी फोन लावल्यानंतर महर्षिनगर परिसरातील अनेक तरूणांनी लगेच निरा नदीच्या घाटाकडे धाव घेतली. मात्र तोवर उशीर झाला होता.

पोहणाऱ्यांनी तरुणांनी पाण्यामध्ये शोध घेतला असता, पाण्यामध्ये दोघेजण सापडले. हाता-तोंडाशी आलेली मुले अशी अचानक हिरावले गेल्यामुळे शक्ती आणि करणच्या परिवाराचा शोक अनावर झाला होता. महर्षिकाॕलनी परिसरातील लोक यावेळी हळहळ करत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here