डॉ राजेंद्र भोसले व मनोज पाटील झाले विठ्ठलाच्यपायी नतमस्तक
पंढरपूर: आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी बुधवारी पहाटे विठ्ठल रुक्मिणी ची शासकीय महापूजा केली. यावर्षी कोरोना संकटामुळे वारकऱ्यांच्या अनुपस्थित वारी पार जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर होम व्कारंटाइन झाले आहेत. या पार्श्वभूमीवर पंढरपुरातील यात्रा नियोजनाची जबाबदारी पुणे विभागीय अतिरिक्त आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्यावर सोपवण्यात आली आहे. मंगळवारी डॉ. भोसले पंढरपुरात आले. सर्व सुत्रे हाती घेत उद्धव ठाकरे यांची पहिली महापूजा चोखपणे पार पाडली. त्यांना वारीचा जुना अनुभव उपयोगी पडला.


पाच महिन्यांपूर्वी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे जिल्हाचा कारभार होता. डॉ. भोसले यांच्या बदलीनंतर त्यांच्या जागी मिलिंद शंभरकर यांची निुयक्ती करण्यात आली. चार महिन्यांपासून सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचे संकट आहे. सर्व प्रशासकीय यंत्रणा याच कामात गुंतून पडली आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे पंढरपुरात येत असताना जिल्हाधिकाºयांना घरात बसून काम करण्याचे आदेश पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले आहेत.

या काळात पंढरपूरसाठी एका अनुभवी अधिकाऱ्याची गरज होती. त्यामुळेच डॉ. राजेंद्र भोसले यांना पंढरपुरात पाठविण्यात आले होते. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची देखील यंदाची पहिलीच वारी होती. त्यांना ही पूर्वी अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून कामाचा अनुभव होता. या दोन्ही अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची महापूजा झाल्यानंतर विठ्ठलाचे दर्शन घेतले.