श्री शिवाजी महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी डॉ भारती रेवडकर

0
160

शिवाजी महाविद्यालयच्या इतिहासात प्रथमच महिला प्राचार्य

श्री शिवाजी महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी डॉ भारती रेवडकर

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

बार्शी – श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री शिवाजी महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी डॉ भारती रेवडकर यांची नियुक्ती करण्यात आली. महाविद्यल्याच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला प्राचार्या ची ही निवड आहे. स्त्रीवादा चा नेहमीच पुरस्कार करणाऱ्या डॉ रेवडकर यांच्या प्राचार्य पदी निवड झाल्याने सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

डॉ भारती रेवडकर यांनी श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी येथे 1986 मध्ये बी पी सुलाखे कॉमर्स कॉलेज येथे ज्युनिअर विभागाकडे प्राध्यापक म्हणून आपल्या कार्याची सुरवात केली. त्यांनी मराठी, इंग्रजी व इतिहास अशा तीन विषयातून एम ए पूर्ण केले आहे. त्याच बरोबर एम फील व संत साहित्यातून पीएचडी केली आहे. 1992 मध्ये सोलापूर जिल्ह्यात महिलांमधून प्रथम नेट परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत. 1995 पासून श्री शिवाजी महाविद्यालयात मराठी विषयाच्या प्राध्यापक म्हणून त्या कार्यरत आहेत. 2014 मध्ये गुणवत्तेच्या आधारावर सोलापूर विद्यापीठातील पहिल्या महिला प्रोफेसर होण्याचा बहुमान त्यांनी मिळवला.

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाच्या त्या सदस्य आहेत. प्राचार्य डॉ. प्रकाश थोरात हे सेवानिवृत्त झाल्याने डॉ. भारती रेवडकर शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिवांच्या आदेशाने ही नियुक्ती करण्यात आली. या निवडी नंतर संस्थेचे अध्यक्ष डॉ. बी वाय यादव, उपाध्यक्ष नंदन जगदाळे, जयकुमार शितोळे, प्रकाश पाटील, अरुण देबडवार, व्ही एस पाटील, सुरेश पाटील, शशिकांत पवार तसेच सर्व कार्यकारणी सदस्य, संस्थेचे सदस्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

प्राचार्य पदी डॉ भारती रेवडकर यांची निवड झाल्याबद्दल बार्शी लाईव्ह परिवाराच्या तर्फे हार्दिक अभिनंदन!

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here