डाॅ.अभिजीत यादव यांचा जेष्ठ साहित्यिक प्रा.भास्कर चंदनशिव यांच्या हस्ते “हासेगांवरत्न” म्हणून सन्मान

0
213

डाॅ.अभिजीत यादव यांचा जेष्ठ साहित्यिक प्रा.भास्कर चंदनशिव यांच्या हस्ते “हासेगांवरत्न” म्हणून सन्मान

कळंब: नागेश्वर चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने हासेगांव(केज) ता.कळंब जि.उस्मानाबाद येथे डाॅ.अभिजीत यादव – एम.बी.बी.एस.[एम.डी](श्वसन विकार तज्ञ) यांना जेष्ठ साहित्यिक प्रा.भास्कर चंदनशिव यांच्या हस्ते “हासेगांवरत्न” म्हणून सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून डॉ.सोनटक्के तर प्रमुख पाहुणे प्रा.भास्कर चंदनशिव, सेवानिवृत्त मुख्याध्यापक अनिल यादव हे उपस्थीत होते.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

डाॅ यादव हे सध्या लातूर येथील विलासराव देशमुख वैद्यकीय विज्ञान संस्था लातूर येथे श्वसनविकारशास्त्र विभागात प्राध्यापक पदावर कार्यरत आहेत. तसेच कोवीड १९ च्या उपचारासाठी योग्य ते प्रशिक्षण घेऊन लातूर येथील शासकीय कोवीड अतिदक्षता विभागात कोवीड वार्डात रुग्ण्सेवा देत आहेत. तसेच ते कोवीड फीवर ओपीडीचे प्रमुख देखील राहीले आहेत. सध्या ते पोस्टकोवीड बाह्यरूग्ण विभागप्रमुख म्हणून विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था लातूर येथे काम पहात आहेत.

बार्शी-येरमाळा रस्त्यावर पाथरी जवळ महिलेला अडवुन दागिणे लुटले

कोरोना काळात त्यांनी केलेल्या उल्लेखनिय कामाची दखल घेऊन १ जुलै डाॅक्टर्स डे निमित्त एम.डी.प्रतिष्ठान आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी लातूर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच महानगरपालिका व लातूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाच्या च्या वतीने १३ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक यांच्या हस्ते त्यांनी कोवीड काळात दिलेल्या योगदानाबद्दल “कोरोना योद्धा” म्हणून सन्मानित करण्यात आले.

हासेगांव(के) मधील पहिलेच एम.बी.बी.एस डॉक्टर होण्याचा बहुमान त्यांना मिळाला. म्हणूनच त्यांचा “हासेगांव रत्न” म्हणून सन्मान करण्यात आला. भास्कर चंदनशिव म्हणाले की नवीन युवा पिढीने अशाच विविध क्षेत्रातील यशस्वी व्यक्तींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मार्गक्रमण करीत अपल्या गावचे व आई वडिलांचे नाव मोठे करावे.

कर्मभुमी कुठेही असो आपल्या जन्मभुमिची नाळ कधीच तुटू देऊ नका असे अवहान केले. डॉ.यादव यांनी आपला प्राथमिक शिक्षण ते वैद्यकीय शिक्षण व डॉक्टर झाल्यानंतर कोविड काळातील अनुभव कथन करुन सर्वांना काळजी घेण्याचे अवहान केले.व आठवड्याच्या शनिवारी व रविवारी कळंब येथील चौधरी बालरुग्णालयात खास कळंब तालुक्यातील नागरिकांसाठी कोविड व पोस्टकोविड 19 ओपिडी सुरु असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश खरडकर, प्रास्ताविक अॅड.प्रविण यादव, तर आभार ज्ञानेश्वर तोडकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अॅड.प्रविण यादव, वैजिनाथ पकवे, सोमनाथ खरडकर, अविनाश खरडकर, अतुल धुमाळ, आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास गावतील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here