सकाळी चहा मिळायचा नाही, लंपीला हलक्यात घेऊ नका; अजित पवारांनी सरकारला सुनावलं
राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत राज्यातील समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधले. देशासह राज्यात लंपीचा प्रादुर्भाव वाढत आहे. या रोगाचा फैलाव होत असल्याने धोका वाढला आहे. या रोगाला हलक्यात घेऊ नका, सकाळच्या चहा मिळायचा नाही, अशा शब्दांत अजित पवार यांनी सरकारला सुनावले.


देशासह राज्यात लिम्पी आजाराचे संक्रमण वाढत आहे. संक्रमित झालेल्या जनांवरांपासून चारा, पाणी दुषित होत असल्याने हा रोग पसरत आहे. साखर कारखाने सुरू होण्याबाबत लवकरच निर्णय होणार आहे. कारखाने सुरू झाल्यावर कारखाना परिसरात मोठ्या प्रमाणात बैल आणि जनावरे कारखाना परिसरात येतात. त्यामुळे रोग मोठ्या प्रमाणात फैलावू शकतो. त्यामुळे सरकारने या रोगाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. याबाबत जनजागृतीचे काम करण्याची गरज आहे. काय खबरदारी घ्यावी, आपल्या पशूधनाचे रक्षण कसे करायची, याची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
लंपी आजारात जनावर दगावल्यास विमा भरपाई मिळत नसल्याची माहिती मिळत आहे. जर विमा कवच मिळत नसेल तर सरकारने शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. राज्यात लंपीची समस्या गंभीर होत आहे. याचा फैलाव रोखण्यासाठी लसीकरणासाठी गरज असलेल्या लसी आपल्याला मिळाल्या पाहिजेत. गरज भासल्यास परदेशातून लसी मागवा. मात्र, आपल्या शेतकऱ्यांचे पशूधन वाचले पाहिजे. प्राण्यांच्या लसीकरणासाठी सरकारने योग्य नियोजन करावे, असेही ते म्हणाले. लंपीमुळे दगावलेल्या प्राण्यासाठी सक्तीने कर्जवसूली करू नये, शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळाली पाहिजे, अशा मागण्या त्यांनी केल्या.