पठाण मामाकडून हिंदू भाचीचें कन्यादान
भारत हा विविध कलागुणांनी आणि जाती धर्मांनी नटलेला देश आहे. इथे अनेक जाती-धाराचे लोक गुण्यागोविंदाने एकत्र राहतात. याची अनेक उदाहरणे आपण वर्तमान पात्रात वाचली सुद्धा असतील तसेच आपल्या आजूबाजूला नजरेस सुद्धा पडले असतील.


याच अनुभवाचा प्रत्यय शेगाव तालुक्यातील बोधेगाव येथे पार पडलेल्या एका लग्न समारंभातून दिसून आला. या लग्नात मुस्लिम समाजाच्या मामाने आपल्या दोन हिंदू भाचींचे कन्यादान केले. त्यामुळे या लग्नाची सध्या जोरदार सोशल मीडियावर चर्चा होताना दिसत आहे.
सविता या शेतकरी कुटुंबातील आहे. मात्र पती मेल्यानंतर पुन्हा त्या माहेरी आल्या आणि तिथेच त्यांनी आपल्या दोन मुलींचा सांभाळ करणे चालू केले. बोधेगावातील त्यांच्या घराशेजारी राहणाऱ्या बाबा पठाण नावाचे गृहस्थ राहतात. सविता भुसारी यांचे ते मानलेले भाऊ. त्यामुळे सविता यांच्या मुलींच्या लग्नात बाबा पठाण मामा म्हणून उभे राहिले.