छावा संघटना: बार्शी तालुकाध्यक्षपदी धिरज शेळके तर शहराध्यक्ष पदी निलेश पवार

0
144

छावा संघटना: बार्शी तालुकाध्यक्षपदी धिरज शेळके तर शहराध्यक्ष पदी निलेश पवार


शहराध्यक्षपदी निलेश पवार, महिला आघाडी तालुकाध्यक्षपदी वैशाली आवारे तर शहराध्यक्षपदी मिताली गरड : पाटील यांची निवड

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

बार्शी : कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसलेली ज्वलंत क्रांतिकारी चळवळ म्हणून छावा संघटनेला ओळखले जाते. सर्वधर्मसमभाव ही भावना ठेवून तळागळातील सर्व जाती धर्मांना एकत्र घेऊन, नागरिकांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी छावा संघटनेने संबंध महाराष्ट्रभर खूप मोठे कार्य केले आहे. ग्रामीण भागातील जनतेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी, छावा संघटनेच्या माध्यमातून जनतेचा दुवा साधण्यासाठी, अखिल भारतीय छावा संघटनेच्या बार्शी तालुका व शहर कार्यकारणीची नियुक्ती करण्यात आली.

मराठ्यांचे क्रांतीसुर्य, अखिल भारतीय छावा संघटनेचे संस्थापक वंदनीय आण्णासाहेब जावळे पाटील यांच्या आशीर्वादाने, संघटनेचे खंबीर पोलादी नेतृत्व, संघटनेचे कार्याध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांच्या नेतृत्वाखाली, संघटनेचे आधारस्तंभ युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष विजयभाऊ घाडगे पाटील आणि प्रदेश अध्यक्ष भीमरावभाऊ मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रदेश संपर्कप्रमुख प्रतापभाऊ कांचन, सोलापूर जिल्हाध्यक्ष अमोल पाटील यांच्या शुभहस्ते क्रांती दिनाचे औचित्य साधून, बार्शी येथील शासकीय विश्रामगृह येथे, बार्शी तालुका व शहर कार्यकारिणीच्या नवा नियुक्त पदाधिकाऱ्यांना पद नियुक्ती पत्र देऊन निवडीचा कार्यक्रम पार पडला.

यामध्ये बार्शी तालुका अध्यक्षपदी सलग तिसऱ्या वेळेस धिरज शेळके यांची नियुक्ती करण्यात आली. तालुका उपाध्यक्ष हरिदास लोखंडे, शहराध्यक्ष निलेश पवार, शहर उपाध्यक्ष चंदन लांडगे, शहर उपाध्यक्ष बाबासाहेब बारकूल, कार्याध्यक्ष बबलू साळुंके, महिला आघाडी तालुकाध्यक्ष वैशाली आवारे, शहराध्यक्ष मिताली गरड पाटील, उपाध्यक्ष सीमा तांबारे, कार्याध्यक्ष वैशाली ढगे, तर सरचिटणीसपदी प्रतिज्ञा गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली.

याप्रसंगी संघटनेचे प्रदेश संपर्कप्रमुख प्रताप भाऊ कांचन व जिल्हाध्यक्ष अमोल पाटील यांनी संघटनेच्या कार्याचा आढावा सांगत, नवनियुक्त सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी छावामय शुभेच्छा दिल्या. यावेळी युवा उद्योजक शशिकांत कांचन, सामाजिक कार्यकर्ते महेश चव्हाण, तानाजी निंबाळकर, तुकाराम शिंदे, अप्पू कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here