बार्शीत ओबीसी अनं सर्वसाधारण प्रवर्गातील आरक्षण नव्याने काढण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
सोलापूर : जिल्ह्यातील पंढरपूर आणि सांगोला तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे आरक्षण नव्याने जाहीर करण्याचा तसेच बार्शी तालुक्यातील तांदुळवाडी ग्रामपंचायतिच्या अर्जदाराचा अर्ज मंजूर करून बार्शी तालुक्यातील SC, ST जातीचे आरक्षण वगळून OBC व OPEN प्रवर्गाचे सरपंच पदाचे आरक्षण दिनांक 22 फेब्रुवारी रोजी परत काढण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत

22 फेब्रुवारी रोजी नवीन सरपंचपदाची आरक्षण सोडत जाहीर होणार आहे. 26 फेब्रुवारी रोजी नव्या आरक्षणानुसार या गावांतील सरपंचांची निवड होणार आहे. पंढरपूर तालुक्यातील ७२ तर सांगोला तालुक्यातील ६१ गावातील ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची २६ रोजी निवड होणार आहे.

सरपंच आरक्षणाच्या विरोधात उच्च न्यायालयात दाखल झालेल्या 22 याचिकांची सुनावणी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्यासमोर झाली. मोहोळ, माढा, माळशिरस व दक्षिण सोलापूर या तालुक्यांतील सरपंच निवडीचे जुने आरक्षण कायम करण्यात आले आहे. या तालुक्यांतील सरपंच व उपसरपंच यांच्या निवडी 23 फेब्रुवारीला होणार आहेत. पंढरपूर आणि सांगोला तालुक्यात तहसीलदारांनी केलेल्या आरक्षणावर जिल्हाधिकारी शंभरकर यांनी नव्याने आरक्षण काढण्याचे आदेश दिले आहेत.


बार्शी तालुक्यातील 129 ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण निश्चित केले होते.त्यामध्ये नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 17 तर नामाप्र महिलांसाठी 18 आणि सर्वसाधारण महिला 41 तर सर्वसाधारण 41 असे आरक्षण होते.
सोलापूर जिल्ह्यातील 1028 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांचे आरक्षण निश्चित
यामध्ये तांदुळवाडी तील काही लोकांनी आमच्या गावात महिलांचे आरक्षण हे डबल पडले असल्याने आमच्यावर अन्याय झाल्याची तक्रार केली होती. त्यानुसार न्यायालयाचे आदेशानुसार जिल्हाधिकारी यांनी ओबीसी आणि सर्वसाधारण जागांसाठी परत आरक्षण काढण्याचा निर्णय घेतला आहे.