जि. प. सीइओंचा साधेपणा !

0
69

जि. प. सीइओंचा साधेपणा !
उस्मानाबाद: जिल्हा परिषदेचे सीईओ मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांच्यातील संवेदनशील अधिकार्‍याचे दर्शन त्यांच्या दालनासमोर झाले. सीईओ गुप्ता एका महत्त्वाच्या बैठकीसाठी स्वतःच्या केबिन मधून उठून बाहेर आले आणि बैठकीसाठी जाताना त्यांच्या केबीन बाहेर एक अपंग मुस्लिम व्यक्ती त्यांना भेटायला आलेले त्यांना दिसले.

. क्षणाचाही विलंब न लावता गुप्ता यांनी त्या वृद्ध दिव्यांग नागरीकाशी संवाद साधून त्यांची समस्या ऐकून घेतली. त्यांचे निवेदन स्वतः स्वीकारले , त्यावर तातडीने कारवाई करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या, या प्रसंगावरून त्यांच्यातील साधेपणाचे आणि माणुसकीचे दर्शन घडले !

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

एक आयएएस अधिकारी असून देखील समाजाप्रती असलेली बांधिलकी , त्यांच्या मनातून आणि कृतीतून दिसून आली ! प्रशासकीय सेवेत इतक्या उंचीच्या पदावर काम करणारा अधिकारी संवेदनशील राहून गोरगरिबांसाठी आणि गरजूंसाठी इतका सहज उपलब्ध होऊ शकतो , यामुळे सर्वसामान्य माणसाच्या मनात शासकीय व्यवस्थेबद्दल निर्माण होणारी अनास्था दूर होण्यास तसेच प्रशासन आणि जनता यांच्या मधील अंतर कमी होण्यास मदत होणार आहे.

त्यांच्या या कृतीचे आणि संवेदनशीलतेचे दर्शन उस्मानाबाद जिल्हावासीयांसाठी अभिमानास्पद आहे.

— देविदास पाठक , पत्रकार
दूरदर्शन-आकाशवाणी-दै. तरुण भारत

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here