दिनांक : २०ऑगस्ट; शनिवार
श्रावणमास प्रवचनमाला
प्रवक्ते: गुरुवर्य डॉ. जयवंत महाराज बोधले
विषय : संत तुकाराम महाराज चरित्र व तत्वज्ञान
आपले मनच आपल्या मनाशी जागृत असले पाहिजे. त्याच्या शिवाय साधना होणार नाही, अशी मनाची जागृत अवस्था जेव्हा प्राप्त होईल तेव्हाच साधना यशस्वी होऊ शकते
बार्शी- साधनेमध्ये ‘भक्ती’ फार महत्वाची आहे. साधना करतानामनुष्याने स्वतःला फार सांभाळावे लागते . कारण आपले मन हे क्षणोक्षणी बदलणारे आहे. मनातील क्षणाक्षणाला तयार होणारे विकार हे साधनेतील मुख्य अडथळे असु शकतात. स्तुती किंवा निंदा हे सुद्धा मन विचलित करणारे आणि साधनेत अडथळे निर्माण करणारे घटक असतात, आपले मनच आपल्या मनाशी जागृत असले पाहिजे. त्याच्या शिवाय साधना होणार नाही, अशी मनाची जागृत अवस्था जेव्हा प्राप्त होईल तेव्हाच साधना यशस्वी होऊ शकते. हेच सर्व सिद्धीचे कारण असु शकते असे संत तुकाराम महाराज म्हणतात असे विवेचन ह. भ. प. डॉ जयवंत बोधले महाराज यांनी केले

आजच्या २३ व्या दिवशीचे निरुपण करताना गुरुवर्य डॉ. जयवंत महाराज बोधले म्हणाले – ‘जागृती म्हणजे आपल्या मनाला कोणत्याही प्रकारच्या विकाराची बाधा न होणे होय. महाराज या संदर्भात एक प्रमाण देतात *”मज निरंतर जागवली .
पुढे संत तुकाराम महाराज म्हणतात- आता मला कर्मतत्वाचा साक्षात्कार झाला पाहिजे. मला आता सगुण तत्वातून निर्गुणतत्वाकडे जायचे आहे . मला या निर्गुण तत्वाची अखंड अनुभूती आली पाहिजे. ही अनुभूती येण्यासाठी अजून मला जागृती आलेली नाही. त्यासाठी मला ज्ञानप्राप्ती करून घ्यावी लागणार आहे, म्हणजेच मला आता स्वरूज्ञानाची प्राप्ती करून घ्यावी लागेल. हे ज्ञान मिळवण्यासाठी माझ्यात तशी जिज्ञासा निर्माण झाली पाहिजे तरच मी साधनेपर्यंत जाऊ शकतो.

या संदर्भात गुरुवर्य डॉ. जयवंत महाराज म्हणतात – साधनेतील मुख्य-०५ अडथळे आहेत ते असे- शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. या पाच विषयात माणूस गुंतला की साधना त्याची सफल होत नाही. समाजात दोन वर्ग आहेत- त्यामध्ये पहिला वर्ग- साध्याची निश्चिती आहे, पण साधनाचा अवलंब माहित नाही. आणि दूसरा वर्ग असा आहे की साधनाचा अवलंब माहित आहे पण साध्यच माहीत नाही. या संदर्भात महाराजांनी अनेक व्यावहारिक उदाहरणे दिली आहेत.

या दोन्ही वर्गातून आपणास एक वर्ग असा ही सांगता येईल की , या दोन्हींमधील जे गुण आहेत ते गुण गृहीत धरले तरीपण काहीना साधनांचीच कांही माहिती नसते . याच साधनेत कांही प्रतिबंध येतात. प्रतिबंध-म्हणजेच लोकेषणा या साधनेतील लोकषणा संदर्भात महाराजांनी सध्याच्या काळातील मोबाईलचा अति वापराचे दुष्परीणाम किती भयानक आहेत हे सोदाहरण जाणीव करून दिली. म्हणून- अति सर्वत्र वर्ज्यत्ये…||

संत तूकाराम महाराज म्हणतात काम, क्रोध, मद, मत्सर हे साधनेतील मोठे विकार आहेत. ही साधना माझ्या मनात कधी येईल सांगता येत नाही. याबाबत संत ज्ञानेश्वर महाराजांचे एक प्रमाण दिलेली आहे. *शब्द जातो ओलांडिले …||
गुरुवर्य जयवंत महाराज म्हणतात – आत्मदर्शना शिवाय समाधान मिळत नाही आणि हे समाधान वृत्तीच्या स्थिरतेमध्ये असते. समाधान मिळवण्यासाठी आत्मदर्शन, त्यासाठी आत्मज्ञान व्हावे लागते आणि आत्मज्ञान होण्यासाठी सदगुरुंची कृपा असावी लागते. सदगुरूंची कृपा झाल्याशिवाय साधनाच होऊ शकत नाही. संत तुकाराम महाराज या संदर्भात त्यांच्या अभंगाद्वारे म्हणतात “पुसावे हेची वाटे, जे जे भेटे तयासी …” || ” देवकृपा करील मज लाज राखी…”|| “अवधियांचा विसर झाला ‘मज या लाजे || मी देह, असे माझे मन त्यात गुंतता कामा नये. मला चिंता वाटते आहे, की देवाची आता कृपा होईल असे मला देव केव्हा सांगतील.
एक सुभाषितकाराचा संदर्भ देत महाराज म्हणतात – मला परमतत्वाचे ज्ञान केंव्हा होईल ? सदगुरुची कृपा कधी होईल ? कारण सद्गुरुंच्या कृपेशिवाय मला परमतत्वाचे ज्ञान होणार नाही. पुढे सुभाषितकार म्हणतात – या जगात गुरू भरपूर आहेत आणि “गुरु दुर्लभपण आहेत. उदा- शिष्याच्या पैस्यावर डोळा ठेवणारे , भोंदुगिरी करणारे आणि दूसरे – शिष्याला परमतत्वाकडे घेवून जाणारे गुरु असे दोन प्रकारचे गुरू आहेत असे तुकाराम महाराज म्हणतात- भोंदूगिरी करणारे, अंगात देव आणणारे, केस वाढवलेले अशा गुरु पासून सावध राहिले पाहिजे.
पुढे संत तुकाराम महाराजांच्या गुरु भेटी विषयीचे चिंतन उद्या होणार आहे.