उजनीमधून 1 लाख तर वीरमधून 14 हजार क्युसेकचा विसर्ग , भीमाकाठी सावधानतेचा इशारा

0
278

उजनीमधून 1 लाख तर वीरमधून 14 हजार क्युसेकचा विसर्ग , भीमाकाठी सावधानतेचा इशारा

पंढरपूर – पावसाची तुफान बँटिंग ज्याप्रमाणे सोलापूर जिल्ह्यात सुरू आहे तशीच ती उजनी जलाशयावर बुधवार 14 आँक्टोंबरला सकाळपासून सुरूच आहे. उजनी व परिसरात दुपारी चार वाजेपर्यंत 74 मिलीमीटर पावसाची नोंद होती. पावसाचा जोर वाढत असल्याने धरणातून दुपारी 15 हजार यानंतर 40 हजार , साडेचार वाजता 50 हजार तर यानंतर 60 हजार तर साडेपाच वाजता 1 लाख क्युसेक वेगाने पाणी भीमा नदीपात्रात सोडले जात आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

वीजनिर्मिती साठी 1600 क्युसेकचा विसर्ग आहे. वीर धरणातून 14500 क्युसेक पाणी नीरा नदीत सोडले जात आहे. यामुळे भीमानदी भरून वाहत आहे. यातच भीमा व नीरा काठी पावसाचा जोर असल्याने भीमाकाठी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बुधवारी सायंकाळी संगमचा विसर्ग 33 हजार तर पंढरपूर चा 35 हजार क्युसेक होता. तो आता वाढत जाईल. बुधवारी दिवसभर सोलापूर जिल्ह्यात ही भीमाकाठी पावसाचा जोर असल्याने पाणी पातळीत लक्षणीय वाढ होईल.

दरम्यान आज दिवसभर भीमानगर व जलाशयाकाठी पावसाचा जोर होता. यामुळे उजनीत पाणी येत होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here