धाराशिव साखर कारखानाकडून पोळा सणासाठी दुसरा हफ्ता २००रू ने जाहिर :- चेअरमन अभिजीत पाटील

0
685

पंढरपूर :- उस्मानाबाद जिल्ह्य़ात नावलौकिक असलेल्या चोराखळी ता. कळंब येथील धाराशिव साखर कारखाना युनीट १ या साखर कारखान्याने गेल्यावर्षी सन २०१९-२० गळीत हंगामात शेतकरी सभासदांनी दिलेल्या ऊसाला पहिला हफ्ता म्हणून २१००रू. दिला होता.तर दुसरा हाफ्ता पोळा सणासाठी २००रू देण्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी घोषित केले आहे.

सन २०१९ -२० उस गाळपास पाठविलेल्या शेतकऱ्यांच्या ऊसाला एफआरपी पेक्षा जास्त दर देणार असल्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी घोषित केले होते. दिलेला शब्द पाळत कोरोनाच्या संकटात आर्थिक अडचणीत शेतकरी आला असल्याने शेतकर्याना आर्थिक आधार मिळणार आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

यंदा पाऊसकाळ चांगला असल्यामुळे या पैशातुन पोळा , लक्ष्मी, गणपती सणास जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यास, उसाची जोपासणूक करून खत तसेच पिकावरील फवारण्या करण्यास या पैशाचा फायदा होणार आहे .कारखाना नेहमी कर्मचारी आणि शेतकरी सभासदाचे हिताचे निर्णय घेत असून सर्वांच्या सुख दुःखात नेहमी डीव्हीपी उद्योग समूहाचे चेअरमन अभिजीत पाटील सहभागी असतात.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here