देवगाव खून प्रकरण : वेश बदलुन गुंगारा देणारा खुनातील आरोपी पाच वर्षानंतर पकडला

0
194

देवगाव खून प्रकरण : वेश बदलुन गुंगारा देणारा खुनातील आरोपी पाच वर्षानंतर पकडला

बार्शी प्रतिनीधी

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

गेली पाच वर्षांपासून वेश बदलुन पोलिसांना गुंगारा देत असलेल्या देवगाव खुन प्रकरणातील फरारी आरोपी अखेर पोलीसांनी ताब्यात घेतला आहे.

भालेराव वस्तीजवळ देवगाव येथे धर्मराज विठ्ठल मांजरे , रा. देवगाव (मां) , ता . बार्शी , जि . सोलापुर यांच्या खुन प्रकरणी सदर गुन्हातील  हवा असलेला संशयित आरोपी वसंत बाबु मांजरे (रा. देवगाव ( मां ) ता बार्शी) यास पोलीसांनी लोणंद,ता.खंडाळा,जि . सातारा येथुन पोलिस पथकाने ताब्यात घेतला

याबाबत अधिक माहीती की, ०२ऑक्टोबर २०१७ रोजी भालेराव वस्तीजवळ देवगाव येथे धर्मराज विठ्ठल मांजरे , रा . देवगाव(मां) यांना आरोपी यांने टॉवेलमध्ये दगड बांधुन डोक्यात मारून जखमी करून त्याच्या अंगावर पेट्रोल टाकुन पेटवुन दिल्याची घटना घडली होती.यावेळी  उपचारादरम्यान धर्मराज विठ्ठल मांजरे हे मयत झाले. त्यादिवसापासुन वसंत बाबु मांजरे हा पुणे , आळंदी , जेजुरी , सातारा या ठिकाणी राहुण वेश बदलुन पोलीसांना गुंगारा देत होता.

 वसंत बाबु मांजरे हा आरोपी लोणंद ,ता.खंडाळा,जि. सातारा येथे असल्याचे गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहीती आधारे तालुका पोलीस ठाणेचे सपोनि शिवाजी जायपत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली  अमोल माने,अभय उंदरे,धनराज फत्तेपुरे या पथकाने लोणंद गावच्या शेजारी असलेल्या पाडळी गावच्या शिवारात महादेव नगर येथुन  पथकाने आरोपी यास ताब्यात घेतले. तसेच याकामी सायबरचे रतन जाधव यांचीही मदत झाली.

_____________

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here