आनंद वार्ता: 15 ऑगस्ट पासून भारतीय शास्त्रज्ञानी तयार केलेली कोरोना ‘कोवॅक्सीन’लस उपलब्ध होणार

0
144

येत्या 15 ऑगस्टला देशाला कोरोनापासून स्वातंत्र्य मिळण्याची शक्यता आहे. संपूर्ण स्वदेशी बनावटीची ‘कोवॅक्सीन’ ही कोरोना प्रतिबंधक लस 15 ऑगस्टला बाजारात उपलब्ध होऊ शकणार आहे. भारत बायोटेक या कंपनीने इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) आणि पुण्याच्या नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरोलॉजी (एनआयव्ही) यांच्या सहकार्याने ही लस तयार केली आहे.

कोवॅक्सीन लसीला काही दिवसांपूर्वीच आयसीएमआरने मानवी चाचणीसाठी परवानगी दिली होती. आयसीएमआरने आज एक पत्रक जारी केले. त्यानुसार या लसीच्या मानवी चाचणीसाठी 7 जुलैपासून नोंदणी सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर सर्व चाचण्या पूर्ण होऊन अहवाल चांगले आले तर 15 ऑगस्टपासून ही लस कोरोनाबाधितांसाठी वापरण्यास सुरुवात करण्यात येईल.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

कोरोनावरील लस बीबीव्ही 152 कोविड लस माणसांना देऊन त्याचा मानवी शरीरावरील परिणाम तपासला जाणार आहे. यासाठी जवळपास 10-12 वेगवेगळ्या संस्थांना हे काम देण्यात आलं आहे, अशी माहिती आयसीएमआरकडून देण्यात आली आहे. आयसीएमआरने या संस्थांना हे काम करताना सर्वोच्च प्राधान्य देण्यास सांगितलं आहे. तसेच सरकारसाठी हे पहिलं प्राधान्य असून या कामावर सरकारचं संपूर्ण लक्ष असल्याचंही या संस्थांना सांगण्यात आलं आहे.


कोरोनाची ही लस आयसीएमआर आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी, पुणे यांनी एकत्रित केलेल्या कामातून विकसित केली आहे. यानंतर आयसीएमआर आणि भारत बायोटेक संयुक्तपणे पूर्व वैद्यकीय आणि वैद्यकीय विकासावर काम करत आहेत. आयसीएमआरने चाचणी करणाऱ्या संस्थांना पाठवलेल्या पत्रात संबंधित कोरोना लस 15 ऑगस्टला नागरिकांसाठी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न असल्याचं म्हटलं आहे. तसेच त्यापूर्वी सर्व वैद्यकीय चाचण्या पूर्ण व्हाव्यात अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

आयसीएमआरने म्हटलं आहे, “या कामाचं अंतिम साध्य या कामात सहभागी सर्व संस्थांनी वैद्यकीय चाचण्यांच्या कामात केलेल्या सहकार्यावर अवलंबून असणार आहे. सर्व संस्थांनी आपल्या वैद्यकीय चाचण्यांच्या कामाला याच आठवड्यात सुरुवात करावी. त्यासाठी या मंजूरी संबंधातील कामांना वेग द्यावा. या कामातील हलगर्जीला गांभीर्याने घेतलं जाईल. त्यामुळेच तुम्हाला या प्रकल्पावर सर्वोच्च प्राधान्यक्रमासह काम करण्याची सूचना देण्यात येते. तसेच यात कोणतीही कमतरता न ठेवता वेळेच्या मर्यादांचं पालन करावं.”


या कोरोना लस वैद्यकीय परिक्षणासाठी निवडण्यात आलेल्या संस्थांमध्ये विशाखापट्टनम, नवी दिल्ली, पटणा, बेळगाव, नागपूर, गोरखपूर, कट्टनकुलाथूर (तामिळनाडू), हैदराबाद, आर्यनगर – कानपूर आणि गोव्याच्या संस्थांचा समावेश आहे. जगभरातील वैज्ञानिक कोरोनावरील लस शोधण्यासाठी अथक मेहनत घेत आहेत. मात्र, अद्याप सार्वजनिक स्तरावर वापरता येईल अशी एकही लस अद्याप उपलब्ध होऊ शकलेली नाही. असं असलं तरी अनेक लस विकसित होत असून त्यांचं माणसांवर परिक्षणही सुरु आहे. यात काही लसचा चांगला उपयोग होत असल्याचं प्राथमिक टप्प्यात निदर्शनास आलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here