वैराग नगरपंचायत करण्याच्या हालचाली झाल्या गतिमान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतली बैठक

0
615

वैराग : बार्शी तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या वैराग नगरपंचायतीचा प्रश्न आता अंतिम टप्याच्या वळणार आला आहे.या संदर्भात चर्चा करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक मुंबई येथे घेतली. त्यात वैराग नगरपंचायत करण्याचा प्रश्न हाती घेतला आहे.

यावेळी सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठकीत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष व जलसंपदामंत्री जयंत पाटील, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार संजयमामा शिंदे, आमदार यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडली.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

यावेळी आमदार यशवंत माने, आमदार संजय मामा शिंदे,माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार दीपक आबा साळुंखे, जिल्हा अध्यक्ष बळीराम (काका) साठे, कार्यकारी अध्यक्ष उमेश पाटील, सोलापूर प्रदेश सचिव रमेश बारसकर, सोलापूर शहराध्यक्ष भारत जाधव, महिला जिल्हा अध्यक्ष अनिता नागणे,उत्तमराव जानकर, निरंजन भूमकर, लतीफ तांबोळी, दिलीप सिध्दे, राजेंद्र हजारे आदि उपस्थित होते. यावेळी सोलापूर जिल्ह्यामधील सामाजिक, राजकिय प्रश्नासंबंधी व विविध विषयांवर यावेळी आढावा घेण्यात आला.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here