शिवाजी शिक्षण मंडळाच्या विश्वस्त मंडळाच्या निवडणुकित डॉ प्रकाश बुरगुटे यांचा पराभव

0
151

शिवाजी शिक्षण मंडळाच्या विश्वस्त मंडळाच्या निवडणुकित डॉ प्रकाश बुरगुटे यांचा पराभव

पंधरापैकी सात जागा झाल्या होत्या बिनविरोध,आठ जागांसाठी लागली होती निवडणूक

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा
q

बार्शी :- सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्याचे कार्यक्षेत्र असलेल्या श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या विश्वस्त मंडळाची त्रेवार्षीक निवडणुकीत आठ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत आज मतमोजणी झाली. यात डॉ प्रकाश बुरगुटे यांचा सर्वात कमी मते मिळाल्याने पराभवास सामोरे जावे लागले.तर पी टी पाटील आणि जयकुमार शितोळे यांना सर्वाधिक 28 मते मिळाली. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी भागवत चव्हाण यांनी दिली.

या निवडणुकीत पंधरा जागांपैकी सात जागा बिनविरोध झाल्या आहेत. तर उर्वरित आठ जागांसाठी नऊ अर्ज असल्याने निवडणुक लागली होती. यावर्षी प्रथमच राजेंद्र पवार व तानाजी शिनगारे या दोघांना कार्यकारी मंडळात संधी मिळाली आहे.

हे सात जण झाले होते बिनविरोध

यंदाच्या निवडणुकीत पेट्रन गटातून डॉ़ बी़वाय़ यादव,
व्हाईस बेनिफॅक्टर गटातून डॉ़ गुलाबराव पाटील,
व्हाईस पेट्रन फेलो गटातून तानाजी शिनगारे, कायम सभासद गटातून राजेंद्र पवार, डॉ़ विलास देशमुख, लाईफ वर्कर गटातून विष्णू पाटील व दिलीप रेवडकर हे सात जण बिनविरोध झाले होते.

अशी पडली मते

पहिला वर्ग व दुसरा वर्ग प्रवर्गातील आठ जागांसाठी सुरेश पाटील-26, प्रकाश पाटील-28, नंदकुमार जगदाळे-23, शशिकांत पवार-24 ,अरुण देबडवार-26, जयकुमार शितोळे-28, सोपान मोरे-25, दिलीप मोहिते-26 व डॉ. प्रकाश बुरगुटे-14 हे नऊ उमेदवार निवडणुकीत उभे होते.33 सभासदांपैकी आज झालेल्या मतदानात 30 जणांनी मतदान केले.यामध्ये डॉ प्रकाश बुरगुटे यांना सर्वात कमी 14 मते मिळाल्याने त्यांचा पराभव झाला. यापूर्वीही एकदा चिठ्ठी वर एकदा मतातून त्यांचा पराभव झाला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here