उपरे परिवाराच्या वतीने श्री भगवंत मंदिरास पितळ धातूंचा दरवाजा अर्पण

0
141

बार्शी : रंगकाम, चित्रकाम, फरशीवरचे कोरीव काम, गणेशमूर्ती, लक्ष्मीचे सुबक मुखवटे तयार करण्यात बार्शी शहर व परिसरात प्रसिद्ध नाव असलेले उपरे पेंटर या परिवारातील कै. माणिकराव उपरे हे गेल्या ६ दशकांपासून बार्शी शहरात रंगकाम करत होते. अक्षरांची सुबकता, उत्तम रंगसंगती आणि वक्तशीरपणा हे त्यांच्या ठायी असलेले गुण होते.
आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव राहूल उपरे आणि कुटुंबियांनी श्री भगवंत मंदिरांमध्ये असलेल्या शेजघराचा नविन पितळ धातूची चौकट व दरवाजा स्वखर्चाने तयार केला. या चौकटीच्या कलाकुसरीचे काम अनेक दिवस सुरु होते. गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर या दरवाजा व चौकटीचे भगवंत चरणी अर्पण कार्यक्रम सोहळा बार्शी तालुक्याचे आमदार राजेंद्र राऊत यांच्या शुभहस्ते व स्मार्ट अॅकेडमीचे संचालक सचिन वायकुळे, उद्योजक सतिश अंधारे, अॅड. नितेश सोडळ, श्री भगवंत देवस्थान कमिटीचे सदस्य कुलकर्णी, नाना सुर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत व उपरे कुटूंबातील सदस्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी अनेक भगवंत भक्त उपस्थित होते.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here