प्रतिनिधी वैराग : शेतकरी कामगार पक्षाचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस भाई सुभाष आण्णा डुरे पाटील यांचे मंगळवारी वयाच्या ७९ व्या वर्षी रात्री ७ वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.त्यांच्या निधनामुळे, राजकिय व सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.


शेतकरी कामगार पक्षाचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस होते इर्ले गावचे सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा दूध संघाचे संचालक या पदावर काम केले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सुन, नातवंडे, असा परिवार आहे त्यांच्यावर उद्या इर्ले येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा
