बार्शी तालुक्यातील वाढते मृत्यू चिंताजनक; गुरुवारी 55 नवीन कोरोना रुग्ण; तब्बल पाच जणांचा मृत्यू

0
1205

बार्शी तालुक्यात आता फक्त १५० कोरोना बाधित रुग्ण

दोन दिवसात नव्याने सापडले ६३ रुग्ण तर ७ मयत

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

बार्शी : बार्शी शहर व तालुक्यात कोरोना रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणामुळे आता फक्त १५० रुग्ण बाधित असल्याचे अहवालात आले आहे तर बुधवार दि २६ रोजी ८ रुग्णांची भर तर दोन मयत तर गुरुवार दि २७ रोजी ५५ रुग्ण तर ५ मयत असे दोन दिवसात पुन्हा ६३ रुग्णांची भर पडली आहे तर दोन दिवसात ७ रुग्ण मयत झाले आहे .


एकीकडे बार्शी तालुक्यात बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असले तरी दररोज कमी जास्त प्रमाणात बाधित रुग्णांची भर पडतच आहे. असे असताना मयत रुग्णांमध्ये देखील वाढ होताना दिसत आहे.

बार्शी तालुक्यात दि २७ गुरुवार रोजी आलेल्या अहवालात बाधित ५५ रुग्णांपैकी शहरातील १५१ जणांचा अहवाल प्राप्त असुन ४३ जण पॉझिटिव्ह झाले आहे . कासारवाडी रोड ४, नागणे प्लॉट १, देशमुख प्लॉट १, व्हनकळस प्लॉट २, आडवा रस्ता १ पाटील प्लॉट २, सोमवार पेठ १, नाळे प्लॉट २, घोडके प्लॉट २, दाणे गल्ली १, म्हेत्रे चाळ १,

दत्त बोळ १, कॅन्सर हॉस्पीटल जवळ ३, गाडेगाव रोड ५, राऊळ गल्ली २, सुभाष नगर ३, पुनमिया प्लॉट ४, मंगळवार पेठ १, सोलापुर रोड १, कुर्डुवाडी रोड १, वैदु वस्ती १, छत्रपती कॉलनी १, गवळे गल्ली १ असे रुग्ण सापडले आहेत तर ग्रामिण मध्ये वैराग ३, लक्षाची वाडी १, बावी २, उपळे दु १, कदम वस्ती १, सौदरे १, घारी १, पानगाव १, कव्हे १, असे बाधित रुग्ण आढळले आहे 

_______

बार्शी तालुक्यात कोरोना बाधित रुग्ण माहीती

आजवर एकुण बाधित रुग्ण – १९३८

बरे झालेले एकूण रुग्ण – १५९५

उपचार सुरु असलेले रुग्ण – १५०

आजवर मयत एकुण संख्या – ८८

घरामध्ये विलगीकरण संख्या -१०३

चालु कंटनमेंट झोन – ३१९

सध्या शहरात अक्टीव रुग्ण – ११५

ग्रामिणमध्ये अक्टीव रुग्ण – ३५

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here