रुग्णांची वाढतेय संख्या बार्शीकरांसाठी धोक्याची घंटा ; दोन दिवसात वाढले २३६ रुग्ण

0
785

रुग्णांची वाढतेय संख्या बार्शीकरांसाठी धोक्याची घंटा ; दोन दिवसात वाढले २३६ रुग्ण
गणेश भोळे

बार्शी :बार्शी शहर व तालुक्यात कोरोना अटोक्यात येतोय असे वाटत असताना पुन्हा नव्याने कोरोना बाधित रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत असल्याने बार्शी शहर सध्या कोरोनाचे हॉटस्पॉट ठरू लागले आहे बार्शी शहरात व तालुक्यात बुधवार व गुरुवार या दोन दिवसात २३६ रुग्ण आढळले असल्याने नागरीकांमध्ये काळ्जीचे वातावरण आहे .

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा


बार्शी शहरातील विविध दाट लोकवस्तीचे भागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गृहविलगीकरणात ठेवलेले रुग्ण बाहेर फिरत असल्याच्या तक्रारीत वाढ झाली आहे , विनाकारण नागरीकही शहरात गर्दी करु लागले आहे . तरुणाईही तासंन तास गप्पा टप्पा सुरु झाल्या आहे. सामाजिक अंतरचे काटेकोर पालन होताना दिसत नाही ,खरेदीसाठी दुकानात गर्दी वाढली आहे. यामुळे प्रशासनाला कोरोनाची साखळी तोडण्या ऐवजी मागील दिवसाचे आकडे पाहता कोरोनाचा प्रसार रोखण्यात अपयश येऊ लागले आहे.

दि ९ व १० सप्टेंबर रोजी प्राप्त झालेल्या अहवालात बाधित रुग्णांची संख्या २३६ झाल्याने व ५ मयतांची नोंद झाल्याने बार्शीकरांच्या काळजीत अधिकच भर पडली आहे

सध्या बार्शी शहर व तालुक्यात ८४९ अॅक्टीव रुग्ण असुन यापैकी गृह विलगीकरणात ६३६ रुग्ण तर उपचार घेत असलेले २१३ रुग्ण आहेत.

बार्शी शहर व तालुक्यात  आजवर ३१६३ रुग्ण बाधित झाले असून यापैकी २२०२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर मागील काही दिवसात मयताची संख्याही वाढत असुन आजवर ११२ मयत झाल्याचे नोंद प्रशासनाकडे आहे.


Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here