धोका कमी झालेला नाही: बार्शी तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी ५० कोरोना बधितांची वाढ तर एक मयत

0
1971

धोका कमी झालेला नाही: बार्शी तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी ५० कोरोना बधितांची वाढ तर एक मयत

बार्शी : बार्शी शहर व तालुक्यात कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याच्या प्रमाण वाढले असले तरी सलग दोन दिवस ५० हुन अधिक रुग्णांची वाढ होत आहे . शुक्रवार दि २८ ऑगस्ट रोजी आलेल्या अहवालात ५० रुग्ण वाढले आहेत तर एक रुग्णाचा मृत्यु झाला आहे .

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

बार्शी शहर व तालुक्यात लाकडाऊननंतर हळुहळु बाजारपेठा पूर्व पदावर येत आहेत मात्र रुग्ण बरे होण्याचे प्रमाण व नागरिकांमधील कोरोना विषयक भिती कमी होत असल्याने नागरीक निर्धास्तपणे मोठ्या प्रमाणावर बाहेर पडुन गर्दी करू लागले आहेत.नियमांना डावलुन नागरिक व्यापारी यांचा मुक्त संचार वाढला आहे .

बार्शीत डॉक्टरची गळफास घेऊन आत्महत्या; वाचा सविस्तर-

तसेच प्रशासना कडुन सुरु असलेल्या व्यापाऱ्यांच्या कोराना तपासणीत अनेकजण पॉझिटिव्ह रुग्ण सापडत असल्याने कोरोना बाधितांचा आकड्यात वाढ होवु लागली आहे.

आज प्राप्त अहवालात बार्शी शहरात २९ रुग्ण सापडले आहे यात सर्वाधिक कुर्डुवाडी रोड येथे ७ रुग्ण , नाळे प्लॉट ४, कसबा पेठ ३, अलीपुर रोड २, गाडेगाव रोड २, बालाजी कॉलनी २, मंगळवार पेठ १, नागणे प्लॉट १, दत्तनगर १, तुळशीराम रोड १,

बार्शी तालुक्यात १८७५ पैकी १६३१ कोरोना रुग्ण झाले बरे ,केवळ १६३ रुग्णावरच उपचार सुरु

सोमवार पेठ १, कापड गल्ली १, गुळओळ रस्ता १ ,शिवाजी नगर १, जावळी प्लॉट १ याभागात रुग्ण आढळले तर ग्रामिण मध्ये वैराग २, उपळे दु ५, देवगाव ३, बोरगाव ३,पानगाव २, गौडगाव १, बावी १, अरणगाव १, चुंब १, काळेगाव २ असे २१ रुग्ण कोराना बाधित मिळाले आहे .

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here