धरण 107 टक्के भरले: उजनीतून भीमेत वीज निर्मितीसाठी 1600 क्युसेकने पाणी सोडले

0
528

पंढरपूर– सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असणारे उजनी धरण 107 टक्क्याहून अधिक भरले असून यातून बुधवारी पहाटे 5 वाजल्यापासून 1600 क्युसेकने वीज निर्मितीसाठी भीमानदीत पाणी सोडण्यास सुरूवात झाली आहे.

भीमा खोरे परिसरात पाऊस मंदावला असून वरील धरणांचे विसर्ग कमी झाले आहेत. दौंड येथून उजनीत 10 हजार क्युसेकहून अधिक वेगाने पाणी येत आहे.
उजनीतून मुख्य कालव्यात 2000 तर सीना बोगद्यात 900 व सीना माढा उपसा योजनेसाठी 262 क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

बार्शीच्या रामभाई शहा ब्लड बँकेला प्लाझमा थेरपीला मान्यता; सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्याला होणार फायदा

उजनी धरण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर असल्याने आति धरणातून नदीत पाणी सोडण्याशिवाय पर्याय नाही. यासाठी वीज निर्मितीस्तव 1600 क्युसेकने पाणी सोडले जात आहे. यात आवक पाहून वाढ होवू शकते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here