तंबाखूजन्य पदार्थांना मनाई, सोलापूरकरांना भुरळ ‘मगई पानाची’ व्यसनमुक्त पिढी घडविण्यासाठी दहिहंडे यांनी घेतला निर्णय

0
678

तंबाखूजन्य पदार्थांना मनाई, सोलापूरकरांना भुरळ ‘मगई पानाची’

व्यसनमुक्त पिढी घडविण्यासाठी दहिहंडे यांनी घेतला निर्णय

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

सोलापूर : देशातल्या कोणत्याही पानाच्या दुकानात गेला तर आपणास तंबाखू, सिगारेट,मावा आणि गुटखाजन्य पदार्थ नक्कीच दिसतात. एकीकडे शहरात तंबाखूजन्य पदार्थांची खरेदी-विक्री जोमात होते.आणि दुसरीकडे असं एक खायच्या पानाचे दुकान आहे जेथे कोणतेही तंबाखूजन्य पदार्थ विकले जात नाहीत.तशी सूचनाही त्यांच्या दुकानात लावण्यात आली आहेत. गुरुवार पेठ येथील बालाजी पान शॉप अस या दुकानाच नाव अाहे.

शिव दहिहंडे या युवकाचे पानाचे दुकान आहे. पान विकणे  हा त्यांचा पारंपारिक व्यवसाय आहे. गेल्या चाळीस वर्षांपासून त्यांचे वडील बंडोपंत नामदेव दहिहंडे हे पान विकतात.१२ वी शिक्षण घेतलेल्या या युवकाने वडीलांचा पारंपारिक व्यवसाय सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. त्याने गुरुवार पेठेत पानाचे स्वतंत्र  दुकान २००८ साली सुरू केले. तेव्हांपासून ते अाजतागायत पान दुकानात तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस ठेवत नाहीत.

शिव सांगतो एकदा का व्यसन जडले की त्यात तरुणाई बुडून निघते. त्यात कुणाचा उद्धार होत नाही. पाण्यासारखा पैसा खर्च होतो. शरीराची नासधूस होते अशा या घातक व्यसनाच्या मगरमीठीत कुणी सापडू नये यासाठी हा निर्णय घेतला आहे.
शहरात अनेक तरुणांना तंबाखूजन्य पदार्थ खाण्याची सवय आहे. अशी तंबाखूजन्य पदार्थांची दुकाने शहरात जागोजागी थाटली आहेत.

शिव सांगतो, असे आयुर्वेदिक पान खाऊन शरीर सुदृढ ठेवता येते शिवाय या पानाचे जरी व्यसन लागले तरी शरीरास कोणती हानी होणार नाही.शरीर उत्तम राहील कोणत्याही आजाराचा धोका नाही. त्यामुळे बालाजी पान शॉप कायम  आरोग्याची काळजी घेते. तसेच त्यांचा स्वच्छ भारत अभियानात मोठा सहभाग आहे.

व्यसनापासून समाज दूर व्हावा यासाठी शासन आणि सामाजिक संस्था जनजागृतीसाठी प्रयत्न करत असतात. पण त्याचा म्हणावा तितका परिणाम दिसून येत नाही. जर विक्रेत्यांनी अशा तंबाखूजन्य पदार्थ विक्री न करण्याचा निर्णय घेतल्यास त्याचे चांगले परिणाम समाजात दिसून येतील. असे झाल्यास  भावी पिढी व्यसनमुक्त पाहायला मिळेल.

चौकट

मगई पानासाठी प्रसिद्ध

बालाजी पान शॉपचे दुकान मगई पानासाठी राज्यात प्रसिद्ध आहे. या पानात ड्रायफूट मसाला असतो. त्यामुळे पानाला विशिष्ट चव येते. तसेच आयुर्वेदिक सर्दी खोकला या पानाने देखील अनेक शहरवासींना भुरळ घातली आहे. त्याचे दरही सर्वसामान्यांना परवडेल अशी अाहेत. मगई पानाचे उत्पादन बिहार राज्यातील बुद्धगया येथे होते. तेथून हे पान सोलापुरात येतात .

चौकट

पानाचे अनेकजण शौकिन

आपल्यापैकी अनेकजण पान खाण्याचे शौकीन असतात. जेवणानंतर पान खाणं ही प्राचीन काळापासून चालत आलेली परंपरा आहे. आयुर्वेदातही पान खाण्याचे फायदे नमुद करण्यात आले आहेत. अगदी आजीबाईच्या बटव्यातही या पानांचा आवर्जुन समावेश करण्यात येतो. अशा या आर्युवैदिक पानांचे अनेक जणी शौकीन आहेत सोलापूर जिल्ह्यातील राजकीय नेते आमदार खासदार सभापती विविध मंत्र्यांनी व उद्योगपती व्यापाऱ्यांना या मगई पानाने भुरळ घातलेली अाहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here