चित्रपटसृष्टीत अनेकांचे करिअर दबंग खानने बरबाद केले ? विवेकचे केले हे हाल
सिने-अभिनेता सुशांतसिंग राजपूत याने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. या आत्मह्त्येनंतर चित्रपट सृष्टीतील घराणेशाहीवर सर्वत्र जोरदार चर्चा होऊ लागली. अनेक कलाकार चित्रपट सृष्टीत चालू असलेल्या घराणेशाहीवर आता उघडपणे बोलू लागले होते.
त्यातच सुशांतच्या आत्महत्येनंतर अनेकांच्या मदतीला धावून जाणाऱ्या भाईजानवर अर्थात सलमान खानवर सुशांतच्या चाहत्यांचा रोष सलमानवर उमटताना दिसून येत होता. वास्तविक सलमानने सुशांतचे करियर संपवले अशा चर्चा होऊ लागल्या होत्या.
पाटणामध्ये तर सलमान खानचे पोस्टर सुद्धा जाळण्यात आले होते. आज सुशांतच्या अगोदर सलमान खानने अनेकांचे करिअर बरबाद केले आहे आज जाणून घेऊया त्यांच्याबद्दल माहिती.
१) विवेक ओबेरॉय:- या यादीत प्रथम नाव येते ते विवेक ओबरॉय कारण सलमान खानची दादागिरी उघडपणे विविएक ओबेरॉय याने पत्रकार परिषदेत बोलून दाखवली होती.
तसेच मला मारण्याची धमकी सुद्धा दिली आहे असे आरोप विवेकने सलमान खानवर लगावले होते. सलमानने शिव्या दिल्या असे सुद्धा सांगितले होते. या बातमीनानंतर अनेक चित्रपट विवेक ओबेरॉयकडून काढून घेण्यात आले होते.

२) ऐश्वर्या राय बच्चन:- सलमान खान बरोबरच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याचं आयुष्यही खूप त्रासदायक होतं. दोघांचा ब्रेकअप अगदी वाईट वळणावर संपले. एका मुलाखतीत ऐश्वर्याने सलमानवर आरोप केला की त्याला माझी कारकीर्द संपवायची आहे.
इतकेच नाही तर शाहरुखच्या चलते-चलते चित्रपटातून ऐश्वर्याला काढून टाकण्यात आले यामध्ये सलमानचाच हाथ होता असा आरोप ऐश्वर्या राय बच्चन हिने लगावला होता. पण ऐश्वर्याने स्वत: ला सावरले आणि स्वत: ला सलमानपासून पूर्णपणे दूर केले.
३) जॉन अब्राहम:- बॉलिवूडमध्ये धूम माजवणारा जॉन सोबत देखील सलमान खानचे वाकडे झाले होते. वास्तविक डान्स टूर दरम्यान सलमान आणि जॉन यांच्यात शुल्का कारणावरून वाद झाला होता.
वादानंतर जॉनने सलमानवर स्टार पॉवरचा दुरुपयोग केल्याचा आरोप केला. त्यानंतर जॉनने खुलासा केला की त्याला बर्याच चित्रपटातून वगळले गेले होते. यामुळे जॉनने स्वतःचे प्रोडक्शन हाऊस उघडले.
४) हृतिक रोशन:- हटके रोशन आणि सलमान खान ह्यांनी कोणताही चित्रपट एकत्र केलेला नव्हता. मात्र सलमान खान हृतिक रोशन यांची चेष्टा करायचा. वास्तविक गुजारिश चित्रपटाच्या वेळी सलमानने हृतिकबद्दल खूप वाईट विनोद केला होता.
यामुळे हृतिक आणि राकेश रोशन दोघांनाही सलमानवर राग आला. पण हृतिक स्वतः एक स्टार किड आणि फॅन्स फेव्हरेट स्टार आहे त्यामुळे सलमान त्याचे काही वाईट करू शकला नाही..