लॉकडाऊनमध्ये केला कोरोनाच्या बातम्यांचा संग्रह ; काशीनाथ कोळी या युवकाचा अनोखा छंद

0
524

लॉकडाऊनमध्ये केला कोरोनाच्या बातम्यांचा संग्रह

२ वर्षांत घरातलं एकही वृत्तपत्र विकले नाही
१ हजारपेक्षा जास्त कात्रणांचा संग्रह
काशीनाथ कोळी युवकांचा अनोखा छंद

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

सोलापूर : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. बराच काळ घरात राहावं लागत असल्यामुळे लोकांमध्ये अस्वस्थता होती. मात्र यामध्ये असेही काहीजणं आहेत जे या वेळेचा सदुपयोग करीत केला अाहे. ऐरवी वेळ नसल्याच्या तक्रारी केल्या जातात. लॉकडाऊनमध्ये मिळालेल्या वेळेत काहीतरी भन्नाट काम केलं तर भविष्यातही ही बाब प्रेरणादायी ठरू शकते.

असेच एक भन्नाट काम दर्गनहळ्ळी येथे राहणार्‍या काशिनाथ कोळी नावाचा युवक करत अाहे. त्याला पुस्तक आणि वृत्तपत्र वाचनाची आवड आहे. त्यांच्याकडे गेल्या २ वर्षांपासूनची वृत्तपत्र उपलब्ध आहेत. आपल्या छोट्याशा गावात माऊली सार्वजनिक ग्रंथालय चालवतो. या ग्रंथालयात १५०० पुस्तकांचा खजिना आहे.

वृत्तपत्रात आलेले लेख, महापुरुषांबाबतच्या बातम्या आणि महत्त्व वर्तमानपत्रात आलेल्या महत्त्वपूर्ण विषयांवरील आधारित लेखांची कात्रणे कट करून आपल्या वहीत चिटकवून तो संग्रह जमा करण्याचा छंद त्याला आहे. त्याने वृत्तपत्रातून आतापर्यंत १ हजारपेक्षा जास्त कात्रण काढली असून ही डायरीच्या पानावर चिकटवली आहे.

लॉकडाऊनच्या काळात तो आपल्या लायब्ररीसाठी काहीतरी वेगळं करायचं असा विचार त्यांच्या मनात घोळत होता.
कोरोनासंबंधित सर्व लेख-बातम्यांची लायब्ररी तयार करीत आहेत. यामध्ये त्यांनी वृत्तपत्रातील एक-एक बातमी वाचून त्यांतील महत्त्वपूर्ण बातम्या व लेखांची कात्रण काढून त्याची स्वतंत्र फाईल तयार केली आहे. काशिनाथने लॉकडाऊनचा काळ असाचा चांगला काम करण्यात जात आहे.

चौकट

2 वर्षांत एकही वृत्तपत्र विकलं नाही

वृत्तपत्रात विविध घटनांबाबत महत्त्वपूर्ण लेख येतात. मात्र एकदा वाचून त्यांच मन भरत नाही. संदर्भ म्हणून भविष्यात वृत्तपत्रातील कात्रणांचा उपयोग करता येईल या आशेने तो हा कात्रणांचा संग्रह करत अाहे. त्यामुळे गेल्या २ वर्षांत त्यांनी वृत्तपत्र रद्दीत विकली नाहीत. रद्दी खराब झाली असेल तर ती इतर वृत्तपत्राला काही होऊ नये यासाठी खराब रद्दी काढून टाकली जाते.

चौकट

बैलगाडीत उभारले फिरते वाचनालय

ग्रामीण भागातील नागरिकांना वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी त्याने आपल्याच गावात बैलगाडीत फिरते वाचनालय सुरू केले. दर रविवारी हे फिरते वाचनालय संपूर्ण गावात फिरते पण सध्या लोक डाऊन असल्यामुळे फिरते वाचनालयाचा उपक्रम बंद आहे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here