‘कोरोना वॉरियर्स’ करतात पार्थिवावर अंत्यसंस्कार
पालिका आयुक्तांच्या आवाहनाला प्रतिसाद
टायगर ग्रुपने उचलली अंत्यसंस्काराची जबाबदारी
सोलापूर – कोरोनाने अख्या जगाला आपल्या कवेत घेतले आहे. या कोरोना संसर्गाच्या भितीने स्वत:ची मुले कोरोनाने मरण पावलेल्या जन्मदात्या अाई-वडीलांचे पार्थिव स्वीकारण्यास अाणि त्यांच्यावर अत्यंसंस्कार करण्यास नकार दिल्याच्या देशात घटना समोर अाल्या होत्या. अखेर पालिका प्रशासनातील कर्मचारी अंत्यसंस्काराची जबाबदारी पार पाडतात. हे विदारक चित्र समोर असताना सोलापुरात माणुसकी जिवंत असल्याचे उदाहरण समोर अाले अाहे.

कविता चव्हाण नावाची एक धाडसी तरुणी अापल्या टायगर ग्रुपच्या सहकारी मित्रासह कोरोनाने मरण पावलेल्या बाधितांच्या पार्थिवावर अत्यंसंस्कार करण्यासाठी पुढे अाली अाहे. सोलापूर जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या मृत्यूचा अाकडा दिवसेंदिवस वाढतच अाहे. अंत्यसंस्कार करण्यासाठी पालिका प्रशासनाची यंत्रणा कमी पडत अाहे. म्हणून सोलापूर मनपा अायुक्त पी. शिवशंकर यांनी मदतीसाठी तरुणांना कोरोना वॉरियर्स बनून पुढे येण्याचे अावाहन केले होते.
पालिका अायुक्तांच्या अहवानाला सकारात्मक प्रतिसाद देत कविता चव्हाण ही धाडसी तरुणी अापल्या सहकारी मित्रांसह पुढे अाली अाणि कोरोना बाधिताने मरण पावलेल्या मयताच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याची तयारी दर्शवली. कवितासोबत टायगर ग्रुपमधील तानाजी जाधव, श्रीमंत चव्हाण, केतन देवी, मधुकर कुरापाटी, प्रल्हाद कळसकर, सागर राठोड, अवी पवार या साऱ्यांनी पुढाकार घेतला.


एक सामाजिक जबाबदारी म्हणून कोरोनाग्रस्ताने मेलेल्या बाधिताच्या पार्थिवावर अंत्यसंस्काराची जबाबदारी उचलली असल्याचे कविता चव्हाण यांनी दैनिक लोकवार्ताशी बोलताना सांगितले. महापालिकेचे आरोग्य अधिकारी व समन्वयक पांडे यांच्या सूचनेनुसार रुग्णालयातील मृतदेह ताब्यात घेऊन अॅम्बुलन्समधून अंत्यविधीच्या ठिकाणी नेणे व त्या त्या धर्मानुसार त्याच्यावर अंत्यसंस्कार करत अाहेत. मयतावर अंत्यसंकार करणार्या या कोरोना वॉरियर्सला सलाम!
कोट
तरूणांनी पुढे यावे
महापालिका आयुक्तांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन कविता चव्हाण आणि त्यांच्या टायगर ग्रुपने कोरोनाग्रस्तांना अंत्यविधीच्या ठिकाणापर्यंत नेण्याची जबाबदारी उचलली असून यांचे पथक चांगल्या पद्धतीने काम करीत आहे. शहरातील ज्या तरूणांना विविध स्तरावर काम करावयाचे आहे त्या तरूणांनी पुढे यावे.
- पंकज जावळे, उपाआयुक्त, सोलापूर महानगरपालिका