कोरोना अपडेट: राज्यातील आकडा तीन लाखांच्या पुढे; शनिवारी 8348 रूग्णांची भर

0
23

ग्लोबल न्यूज – राज्यात कोरोनारुग्णांच्या संख्येने राज्यात 3 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. एकट्या मुंबईतच 1 लाखांवर रुग्ण सापडले आहेत. आज राज्यात तब्बल 8348 नव्या रुग्णांची भर पडली. तर 144 जणांचा मृत्यू झाला आहे.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील एकूण रुग्णसंख्या 3,00,937 वर गेली आहे. यापैकी 1,23,377 रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर 1,65,663 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात आजवर 11,596 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईत आज 1186 नवे रुग्ण आढळले तर 65 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे मुंबईतल्या रुग्णांची संख्या 1,00,350 एवढी झाली. तर आत्तापर्यंत 5,650 जणांचा मृत्यू झाला आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

राज्यात आज 144 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर 3.85 टक्के एवढा आहे.

राज्यात नोंद झालेले 144 मृत्यू हे मुंबई मनपा-65, ठाणे-1, नवी मुंबई मनपा-1, कल्याण-डोंबिवली मनपा-6,उल्हासनगर मनपा-1, भिवंडी-निजामपूर मनपा-3, वसई-विरार मनपा-8, रायगड-1, नाशिक-2, नाशिक मनपा-2, धुळे मनपा-1, जळगाव-1, पुणे-9, पुणे मनपा-16, पिंपरी-चिंचवड मनपा-7, सोलापूर-1, सोलापूर मनपा-4, रत्नागिरी-5, औरंगाबाद मनपा-4, लातूर-1, उस्मानाबाद-1, अमरावती-1, अमरावती मनपा-1, बुलढाणा-2 या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहेत.

दिलासादायक बाब म्हणजे राज्यात आज 5,306 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 55.5 टक्के इतके झाले आहे. आजपर्यं पाठविण्यात आलेल्या 15,22,564 नमुन्यांपैकी 3,00,937 नमुने पॉझिटिव्ह (19.76 टक्के) आले आहेत. राज्यात 7,40,884 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या 45,552 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

दरम्यान, भारतात तयार होत असलेल्या कोवॅक्सिन नावाच्या लशीची पहिली मानवी चाचणी येत्या ऑगस्टमध्ये सुरू होणार आहे. त्यासाठी महाराष्ट्रातल्या 60 जणांची निवड करण्यात आली आहे. त्यांना या पहिल्या चाचणी अंतर्गत ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात लस टोचण्यात येईल. नागपूरमध्ये ही चाचणी केली जाणार आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील           

मुंबई: बाधित रुग्ण- (१,००,३५०), बरे झालेले रुग्ण- (७०,४९२), मृत्यू- (५६५०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२९१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२३,९१७)

ठाणे: बाधित रुग्ण- (७३,२८९), बरे झालेले रुग्ण- (३४,०१७), मृत्यू- (१९६७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३७,२९५)

पालघर: बाधित रुग्ण- (११,५६६), बरे झालेले रुग्ण- (६२४१), मृत्यू- (२३४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५०९१)

रायगड: बाधित रुग्ण- (१०,८४१), बरे झालेले रुग्ण- (५७३३), मृत्यू- (२११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (४८९५)

रत्नागिरी:  बाधित रुग्ण- (११२५), बरे झालेले रुग्ण- (६८६), मृत्यू- (४०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३९९)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (२७१), बरे झालेले रुग्ण- (२२९), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३७)

पुणे: बाधित रुग्ण- (५१,५७५), बरे झालेले रुग्ण- (१८,८८१), मृत्यू- (१३१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३१,३८०)

सातारा:  बाधित रुग्ण- (२२५४), बरे झालेले रुग्ण- (१२१७), मृत्यू- (७५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (९६१)

सांगली: बाधित रुग्ण- (८७०), बरे झालेले रुग्ण- (४४०), मृत्यू- (२१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४०९)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (१८६५), बरे झालेले रुग्ण- (९०४), मृत्यू- (२९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९३२)

सोलापूर: बाधित रुग्ण- (५३१८), बरे झालेले रुग्ण- (२४३३), मृत्यू- (३८२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२५०२)

नाशिक: बाधित रुग्ण- (८९६८), बरे झालेले रुग्ण- (५०८५), मृत्यू- (३७५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३५२६)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (१२२०), बरे झालेले रुग्ण- (७०५), मृत्यू- (३३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४८२)

जळगाव: बाधित रुग्ण- (७१६६), बरे झालेले रुग्ण- (४५१५), मृत्यू- (३८२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२२६९)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (३६०), बरे झालेले रुग्ण- (१७२), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१७२)

धुळे: बाधित रुग्ण- (१८१४), बरे झालेले रुग्ण- (१२२७), मृत्यू- (८२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (५०३)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (९४५५), बरे झालेले रुग्ण- (५२३४), मृत्यू- (३६४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३८५७)

जालना: बाधित रुग्ण- (१२९८), बरे झालेले रुग्ण- (६६१), मृत्यू- (५४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५८३)

बीड: बाधित रुग्ण- (३२३), बरे झालेले रुग्ण- (१५२), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (१६३)

लातूर: बाधित रुग्ण- (१०१५), बरे झालेले रुग्ण- (४३४), मृत्यू- (४८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५३३)

परभणी: बाधित रुग्ण- (३०९), बरे झालेले रुग्ण- (१५७), मृत्यू- (७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४५)

हिंगोली: बाधित रुग्ण- (३८७), बरे झालेले रुग्ण- (२९५), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८९)

नांदेड: बाधित रुग्ण- (७८०), बरे झालेले रुग्ण (४०३), मृत्यू- (३४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३४३)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (४८१), बरे झालेले रुग्ण- (२९६), मृत्यू- (२४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१६१)

अमरावती: बाधित रुग्ण- (११२७), बरे झालेले रुग्ण- (७३७), मृत्यू- (४५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३४५)

अकोला: बाधित रुग्ण- (२०१८), बरे झालेले रुग्ण- (१६२३), मृत्यू- (९६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२९८)

वाशिम: बाधित रुग्ण- (२३१४), बरे झालेले रुग्ण- (१३४), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१७५)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (४८२), बरे झालेले रुग्ण- (२२५), मृत्यू- (२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२३५)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (५०८), बरे झालेले रुग्ण- (३४९), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४३)

नागपूर: बाधित रुग्ण- (२४८३), बरे झालेले रुग्ण- (१४२८), मृत्यू- (२४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०३०)

वर्धा: बाधित रुग्ण- (६६), बरे झालेले रुग्ण- (३३), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३१)

भंडारा: बाधित रुग्ण- (१७९), बरे झालेले रुग्ण- (१००), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७७)

गोंदिया: बाधित रुग्ण- (२२५), बरे झालेले रुग्ण- (१८६), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३६)

चंद्रपूर:  बाधित रुग्ण- (२१४), बरे झालेले रुग्ण- (१३४), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८०)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (१७३), बरे झालेले रुग्ण- (१०५), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६७)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (२४८), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (३२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२१६)

एकूण: बाधित रुग्ण- (३,००,९३७), बरे झालेले रुग्ण-(१,६५,६६३), मृत्यू- (११,५९६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३०१),ॲक्टिव्ह रुग्ण-(१,२३,३७७)

 (टीप- आजच्या अहवालात पूर्वी ठाणे मनपा मध्ये दर्शविण्यात आलेले १९ मृत्यू त्यांच्या रहिवासी पत्त्यानुसार ठाणे ग्रामीण ( ७), कल्याण डोंबिवली (६), नवी मुंबई (५) आणि भिवंडी मनपा (१) च्या एकूण मृत्यूसंख्येत दाखविण्यात आले आहेत. ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर. पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोरोना बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here