सोलापूर ग्रामीण भागात 159 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

0
95

बार्शी: सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व नगरपालिका क्षेत्र दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. आज शनिवारी ग्रामीण भागातील 159 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 100 पुरुष तर 59 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 46 आहे.

सोलापूर जिल्ह्यातील आज पर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या 3812 इतकी झाली आहे. यामध्ये 2323 पुरुष तर 1489 महिला आहेत. यामध्ये एक व्यक्ती पुणे येथे पॉझिटिव्ह आढळून आली आहे तर आज पर्यंत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 108 जणांचा मृत्यू झाला आहे यात 72 पुरुष तर 36 महिलांचा समावेश होतो जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णांची संख्या 1550 आहे .यामध्ये 961 पुरुष 589 महिलांचा समावेश होतो आज पर्यंत रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 2154 यामध्ये 1290 पुरुष तर 864 महिलांचा समावेश होतो.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here