दिलासादायक: पुणे विभागात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण साठ टक्क्यांवर; वाचा सविस्तर-

0
28

ग्लोबल न्यूज – पुणे विभागातील 17 हजार 54 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 28 हजार 248 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 10 हजार 93 आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकूण 1 हजार 101 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 551 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये कोरोना आजारातून बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 60.37 टक्के आहे, तर मृत्यूचे प्रमाण 3.90 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

बुधवारी (दि. 1) दुपारी तीन वाजेपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार, आजपर्यंत विभागामध्ये एकूण 1 लाख 78 हजार 352 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 1 लाख 74 हजार 846 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 3 हजार 506 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 1 लाख 46 हजार 270 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 28 हजार 248 नमून्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

कालच्या (मंगळवार) बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 1 हजार 274 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 1186, सातारा जिल्ह्यात 19, सोलापूर जिल्ह्यात 35, सांगली जिल्ह्यात 23 तर कोल्हापूर जिल्ह्यात 11 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

पुणे जिल्हा – पुणे जिल्हयातील 23 हजार 321 पॉझिटिव्ह रुग्ण असून कोरोना बाधित 13 हजार 731 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 हजार 824 आहे. कोरोनाबाधित एकूण 766 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 425 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये ब-या होणा-या रुग्णांचे प्रमाण 58.88 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 3.28 टक्के इतके आहे.

सातारा – सातारा जिल्हयातील कोरोना पॉझिटिव्ह 1050 रुग्ण असून 740 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 265 आहे. कोरोनाबाधित एकूण 45 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर – सोलापूर जिल्हयातील 2 हजार 644 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असून 1 हजार 624 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 753 आहे. कोरोना बाधित एकूण 267 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली – सांगली जिल्हयातील कोरोना पॉझिटिव्ह 383 रुग्ण असून 239 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 132 आहे. कोरोना बाधित एकूण 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर – कोल्हापूर जिल्हयातील 850 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असून 720 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 119 आहे. कोरोना बाधित एकूण 11 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here