दुःखद बातमी:उत्तर प्रदेश सरकारमधील कॅबिनेट मंत्र्याचा कोरोनामुळे मृत्यू

0
226

लखनऊ : उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारमधील कॅबिनेट मंत्री कमला राणी वरूण यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यांची 18 जुलै रोजी कोरोना चाचणी करण्यात आल्यानंतर कमला राणी वरूण यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. कमला राणी वरूण यांच्या कुटुंबियांनाही क्वारंटाइन करण्यात आले आहे.

कमल वरूण या उत्तर प्रदेश विधानसभेच्या सदस्य होत्या. शिवाय, या अगोदर त्या खासदार देखील राहिलेल्या होत्या. उत्तर प्रदेश सरकारमध्ये सध्या त्या तंत्रशिक्षण मंत्री होत्या. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले होते.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

त्यांच्यावर लखनऊमधील एसजीपीजीआय येथे उपचार सुरू होते. १८ जुलै रोजी त्यांचे नमूने तपासण्यात आले होते, जे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले होते. शिवाय, त्यांच्या कुटुंबातील अन्य सदस्य देखील कोरोनाबाधित असल्याची माहिती समोर आली आहे.

भाजपने त्यांना 2017 रोजी कानपूरच्या घाटमपूर मतदार संघातून उमेदवारी दिली होती. ही जागा भाजपकडून जिंकवून आणणाऱ्या त्या पहिल्या आमदार होत्या. योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमध्ये त्या कॅबिनेट मंत्री म्हणून काम पाहात होत्या.त्यांच्या मृत्यू बाबत ANI वृत्तसंस्थे ने वृत्त दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here