मोहोळ : कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ पोलीस ठाण्यातील सबजेल मधील २० पैकी १३ आरोपींना कोरोनाची लागण झाली आहे.

सुरुवातीला ३ संशयित आरोपींना सर्दी खोकल्याचा त्रास सुरु झाला होता, त्यामुळे या सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यानंतर या तिघांचे कोरोना अहवाल सकारात्मक आले आहेत. दरम्यान, सबजेलमधील मोठ्या प्रमाणात आरोपींना कोरोनाची लागण झाल्याने मोहोळ परिसरात एकचं खळबळ उडाली आहे.
एकूण १३ आरोपींचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह

सब जेलमधील उर्वरित एकूण १७ आरोपींची कोरोना तपासणी करण्यात आली. कोरोना चाचणी करण्यात आलेल्या १७ आरोपीमधील १० आरोपींचे कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, त्यामुळे जेलमधील एकुण १३ आरोपींचे कोरोना अहवाल हे पॉसिटीव्ह आले आहेत. आरोग्य अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार पॉझिटीव्ह आरोपी रुग्णांना आता सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात पुढील उपचाराकरिता हलवण्यात आले आहे.

जेलसह पोलीस स्टेशन परिसर स्वच्छता करून सॅनिटायझर करून घेतला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांनी दिली आहे.