सोलापूर: सोलापुर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आज बुधवार दिनांक 19 रोजी 258 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले, तर 8 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. उपचार घेऊन बरे झाल्याने तब्बल 235 रुग्णांना घरी सोडले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार यांनी दिली.

सोलापुर जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रात1664जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 258 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह तर 1406जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 258 पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये 164 पुरुष आणि 94 स्त्रियांचा समावेश आहे. जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 8380 झाली आहे.
अक्कलकोटमधील बुधवार पेठ, दुधनी, किणी, कुरनूर, करमाळ्यातील चांदगुडे गल्ली, देवळाली, गुलसडी, जातेगाव, मेनरोड, रोशेवाडी, संभाजी नगर, तेली गल्ली, झरे, मंगळवेढ्यातील बोराळे, ब्रम्हपुरी, गोनेवाडी, कुंभार गल्ली, लक्ष्मी दहिवडी, मरवडे, शिरनांदगी, तळसंगी, मोहोळमधील कामती खु., नरखेड, वाफळे,

बार्शीतील जामगाव आ., काटेगाव, कोरफळे, महागाव, शेलगाव, उत्तर सोलापुरातील बीबी दारफळ, मार्डी, माढ्यातील बेंबळे, भोसरे, कुंभेज, कुर्डू, कुर्डूवाडी, मोडनिंब, वरवडे येथे नव्या रुग्णांची भर पडली आहे. माळशिरस तालुक्यातील 61 फाटा,
अकलूजमध्ये 21 रुग्ण, बागेचीवाडी, बोंडले, बोरगाव, कन्हेर, कुसमोड, लवंग, लोंढे-मोहितेवाडी, माळीनगर, मांडवे, नातेपुते, पिलीव, संग्राम नगर, तांबवे, तांदुळवाडी, पंढरपुरातील अनिल नगर, भक्तीमार्ग, भंडीशेगाव, बादुले चौक, चळे, जळोली, जुनी पेठ, कडबे गल्ली, कालिकादेवी चौक, करकंब, कासेगाव, करोळे, खर्डी, कोळी गल्ली, लक्ष्मी टाकळी, महापौर चाळ, मनिषा नगर, नेमतवाडी, मुंढेवाडी, पळशी, परदेशी नगर,

सांगोला रोड, संत पेठ, स्टाफ क्वॉर्टर उपजिल्हा रुग्णालय, सुस्ते, उंबरेपागे, वाडीकुरोली, वाखरी, सांगोल्यातील जवळा, कडलास, महूद, मेथावडे, नाझरे, वाढेगाव, वाकीशेगाव, दक्षिण सोलापुरातील मनगोळीत आठ आणि विंचूर येथे दोन रुग्ण आढळले आहेत.

‘या’ गावातील रुग्णांचा मृत्यू
वाफळे (ता. मोहोळ) येथील 53 वर्षीय पुरुष, कामती खुर्द येथील 77 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे. तर पंढरपुरातील संतपेठेतील 80 वर्षीय पुरुषाचा, शेगाव दुमाला येथील 67 वर्षीय पुरुषाचा, दक्षिण सोलापुरातील फताटेवाडी येथील 75 वर्षीय पुरुषाचा, तर मनगोळीतील 27 वर्षीय पुरुषाचा, बार्शी तालुक्यातील वैरागमधील 72 वर्षीय महिला, माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील 63 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

-एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती : 66884
-ग्रामीण भागातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती : 8380
-प्राप्त तपासणी अहवाल : 66772 ,-प्रलंबित तपासणी अहवाल : 162 -निगेटिव्ह अहवाल : 58343 -आजपर्यंत एकूण मृतांची संख्या : 237-रुग्णालयात दाखल असलेल्या बांधितांची संख्या : 2877 -रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेले बाधितांची संख्या : 5266