ग्लोबल न्यूज- देशातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस नवा उच्चांक गाठत आहे. देशभरात गेल्या 24 तासांत आजवरची सर्वाधिक 49,310 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच मागील 24 तासांत 740 मृत्यू झाले असून देशातील एकूण मृतांची संख्या 30,601 वर पोहोचली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 12,87,945 झाली आहे. त्यापैकी 4,40,135 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिलासादायक बाब म्हणजे देशातील 8,17,209 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील 24 तासांत देशात 740 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून देशातील मृतांची संख्या 30,601 वर पोहोचली आहे.
आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार, देशात आजवर 1,54,28,170 नमुने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 3,52,801 चाचण्या या 23 जुलै रोजी करण्यात आल्या आहेत.

देशात सर्वाधिक रूग्ण असलेली पाच राज्ये (कंसात मृत्यू)
महाराष्ट्र – 3,47,502 (12,854)
तमिळनाडू – 1,92,964 (3,232)

दिल्ली – 1,27,364 (3,745)
कर्नाटक – 80,863 (1,616)
आंध्र प्रदेश – 72,711 (884)
देशात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असली तरी बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील वाढत आहे. मागील 24 तासांत देशात 34,602 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
धक्कादायक बाब म्हणजे 12 ते 15 दिवसांत कोरोनाचा संसर्ग होण्यासाठी लागणारा वेग आता 3 ते 2 दिवसांवर आला आहे. गेल्या तीन दिवसांत सर्वाधिक कोरोनाच्या नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. रिकव्हरी रेट चांगला असला तरीही संसर्ग होण्याचा वेग कमी झाला नाही.
सोर्स एम पी सी न्यूज