कोरोना महामारी: मुंबईने दिली मोठी दिलासादायक बातमी; वाचा सविस्तर-

0
537

ग्लोबल न्युज: कोरोना ने संपूर्ण जगभरात थैमान घातलं आहे. भारतातही कोरोना बाधितांची संख्या मोठी आहे.दररोज आकडे वाढतच आहेत.देशात महाराष्ट्रात कोरोना बाधितांचा आकडा हा सर्वाधिक आहे. महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई  शहराला कोरोनाने वेढा घातला आणि बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत होता. पण आता कोरोनाचा हा वेढा सैल होत चालला आहे. कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईतील परिस्थितीत आता खूपच चांगली सुधारणा होत आहे. त्याच दरम्यान आता मुंबईने सर्वांना एक मोठी दिलासादायक बातमी दिली आहे. 

मुंबईचा रिकव्हरी रेट देशात सर्वाधिक 

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

मुंबईतील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या जरी १ लाखांहून अधिक असली तरी रुग्ण बरे होण्याचा दर हा खूपच चांगला आहे. कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचा मुंबईतील दर हा ७० टक्के इतका आहे. हा दर संपूर्ण देशातील रिकव्हरी रेटपेक्षा अधिक आहे. भारतातील कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचा दर हा ६३ टक्के इतका आहे. तर महाराष्ट्राचा रुग्ण बरे होण्याचा दर ५५.०५ टक्के इतका आहे. 

मुंबई महानगरपालिका, राज्य सरकार यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक प्रयत्न, मोहिम राबविण्यास सुरूवात केली. घरोघरी जाऊन सर्वेक्षण, रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा वेळेत शोध घेतला, हॉटस्पॉट आणि प्रतिबंधक क्षेत्रात सर्वेक्षण करण्यात आले, घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी करण्यात आली, सामाजिक उपक्रम, जागोजागी निर्जंतुकीरणाचे, धुर फवारणीचे काम करण्यात आले आणि या सर्वांचा सकारात्मक परिणाम दिसून आला, परिणामी रुग्ण बरे होण्याचा दर वाढला आहे.

मुंबईतील कोरोनाची स्थिती काय?

राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या १८ जुलै २०२० पर्यंतच्या आकडेवारीनुसार, मुंबईतील एकूण बाधित रुग्णांची संख्या ही १,००,३५० इतकी आहे. यापैकी ७०,४९२ रुग्ण बरे होऊन डिस्चार्ज देण्यात आला आहे. ५६५० जणांचा मृत्यू झाला आहे. इतर काणामुळे २९१ जणांचा मृत्यू झाला आहे तर सध्यस्थितीत मुंबईत २३,९१७ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

महत्वाचे मुद्दे 

मुंबई जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांचा दर – ७० %

१२ जुलै ते १७ जुलैपर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर – १.३० %

१७ जुलै २०२० पर्यंत मुंबईत झालेल्या कोविडच्या एकूण चाचण्या – ४,२७,३६८ 

मुंबईतील रुग्ण दुपटीचा दर – ५४ दिवस 

१७ जुलैपर्यंत मुंबईतील सक्रिय कंटेन्मेंट झोन (झोपडपट्टी, चाळी) – ७०८

१७ जुलैपर्यंत सक्रिय सीलबंद इमारती – ६२३५ 

देशातील एकूण रुग्ण संख्या 

१९ जुलै २०२० रोजी सकाळपर्यंतच्या आकडेवारीनुसार, संपूर्ण देशात कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १०,७७,६१८ इतकी आहे. यापैकी ६,७७,४२३ रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला आहे. २६,८१६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर ३,७३,३७९ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर रुग्ण बरे होण्याचा दर ६३ टक्के इतका आहे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here