सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच; 663 पॉझिटिव्ह आणि 13 मृत्यू

0
324

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे मृत्यूचे प्रमाण सुद्धा जास्त दिसून येत आहे.आज शनिवारी दि.12 सप्टेंबर रोजी ग्रामीण भागातील तब्बल 663 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 410 पुरुष तर 253 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 306 आहे. आज 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

आज एकूण 4068 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 3405 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

सोलापूर जिल्ह्यातील आज पर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या 16 हजार 738 इतकी झाली आहे. यामध्ये 10,227 पुरुष तर 6511 महिला आहेत. यामध्ये एक व्यक्ती पुणे येथे पॉझिटिव्ह आढळून आली आहे.

आज पर्यंत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 481 जणांचा मृत्यू झाला आहे यात 333 पुरुष तर 148 महिलांचा समावेश होतो जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णांची संख्या 5 हजार 454 आहे .यामध्ये 3 हजार 451 पुरुष तर 2003 महिलांचा समावेश होतो. आज पर्यंत रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 10 हजार 803 यामध्ये 6440 पुरुष तर 4363 महिलांचा समावेश होतो.

अक्कलकोट -5

बार्शी – 107

करमाळा – 66

माढा – 71

माळशिरस – 93

मंगळवेढा – 48

मोहोळ – 20

उत्तर सोलापूर – 3

पंढरपूर – 190

सांगोला – 55

दक्षिण सोलापूर – 5

एकूण 663 कोरोना बाधित व्यक्ती आढळून आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here