बार्शी तालुक्यात कोरोनाची वाढ सुरूच , शनिवारी १४ पॉझिटिव्ह रुग्णांची भर ; वाचा कुठे कुठे सापडले रुग्ण

0
70

बार्शी तालुक्यात कोरोनाची वाढ सुरूच , शनिवारी १४ पॉझिटिव्ह रुग्णांची भर

बार्शी तालुक्यात बाधित रुग्णसंख्या पोहचली १०५ वर

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

बार्शी : बार्शी तालुक्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. शनिवार दि ४ जुलै रोजी प्राप्त झालेल्या अहवालपैकी १४ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.

बार्शी शहरासह ग्रामीण भागातील रुग्णाचा यात समावेश आहे. शहरातील तहसील कार्यालयात असलेल्या सबजेल पर्यंत कोरोनाचा प्रादुर्भाव झाला असून सबजेल मधील न्यायालयीन कोठडीतील २ आरोपींना कोरोनाची बाधा झाली असून आता याची एकूण बाधित संख्या १४ वर पोहचली आहे .

तर तिघांचा मृत्यू झाला आहे. आजअखेर बार्शी तालुक्यात एकूण १०५ बाधित रुग्ण आढळले आहेत. तर २८ रुग्ण बरे झाले आहेत. आज बाधितांचा आकडा ८७ वरून थेट १०५ वर गेल्याने तालुक्यातील नागरिकांनी आता अधिक काळजी घेण्याची गरज आहे.

सकाळच्या व दुपारच्या अहवालानुसार बार्शी शहरात ८ रूग्ण कोरोना बाधित आले आहेत .सबजेल तहसील आफीस मधील २ कैदी बाधित निघाले तर नाईकवाडी उपळाई रोड -१, उपळाई रोड (भवानी पेठ)-२,पाटील प्लॉट -१,नागोबाचीवाडी -५, वैराग- १,साकत पिंपरी – १,उक्कडगाव -१, असे १४ रूग्णांची वाढ झाली आहे.तर सध्या ६२ स्वब अहवाल प्रलंबित आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here