पुणे : राज्यात कोरोनाचं थैमान दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यात पुणे शहरसह जिल्ह्यात कोरोनामुळे हाहाकार उडाला आहे. शहरालगतचा हवेली तालुकाही आता कोरोनाचा नवे हॉटस्पॉट समोर आले आहेत. त्यात विशेषत: खडकवासला आणि खानापूर परिसरात तर 250 हून जास्त नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे या गावांनी लॉकडाऊन जाहीर होण्याआधीच ही स्वयंपूर्तीने ही गावं बंद ठेवली आहेत.

खडकवासला, किरकिटवाडी, खानापूर, डोनजे, गोऱ्हे ही गावं कोरोनाबाधित असून रुगसंख्या 250 च्यावर पोहोचली आहे. दुसरीकडे नगर रोडला वाघोली, सोलापूररोडला मांजरी या पुण्यालगतच्या गावात सर्वाधिक संसर्ग आहे. ग्रामीण भागात 4000 रुग्ण आहेत. त्यापैकी 2500 रुग्ण झाले आहेत. आतापर्यंत कोरोनामुळे 100 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

पुणे शहरालगतच्या 23 गावांमध्येही कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर वाढू लागल्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी तिथं आता प्रत्येक 50 कुटुंबांमागं एक सेक्टरप्रमुख नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. या सेक्टर प्रमुखाच्या माध्यमातूनच तिथल्या कोरोना साथीचं निर्मुलन केलं जाणार आहे.

पुणे शहरात तर कोरोनाचा उद्रेक सुरूच आहे. पण मनपा हद्दीलगतची 23 गावं देखील कोरोनाबाधीत बनली आहेत. कारण या गावांमधील बहुतांश लोक हे नोकरी धंद्यानिमित्त पुणे शहरात येजा करतात. म्हणूनच 23 गावांमधील कोरोना आटोक्यात आणण्यासाठी या गावांमध्ये लॉकडाऊन काळात सगळीकडे फवारणी केली जात आहे. तसंच घरोघरी जाऊन आरोग्य सर्वेक्षण केलं जात आहे.