उस्मानाबाद – उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. बुधवार दि. ९ सप्टेंबर रोजी २५८ कोरोना रुग्णाची वाढ झाली आहे तर गेल्या २४ तासात चार जणांचा मृत्यू झालेला आहे.तसेच आज दिवसभरात 121 जण बरे होवून घरी परतले आहेत.


जिल्ह्यात कोरानाबाधित रुग्णांची एकूण संख्या 7 हजार 657 झाली आहे. यातील 4 हजार 869 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 220 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 2 हजार 568 जणांवर उपचार सुरु आहे.
आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

