केतकी चितळेंचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य….!

0
208

केतकी चितळेंचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य….!

केतकी चितळेने पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यामुळे पुन्हा तिच्या विरोधात सामान्य नागरिकांमध्ये असंतोष उफाळून आला आहे. यावेळी पुन्हा एकदा केतकी चितळेने आपल्या फेसबुक अकाउनवरून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत वादग्रस्त पोस्ट केली आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

शिवाजी, फक्त एवढे ऐकले की आम्ही उगाच पेटून उठणार. मजकूर आम्हाला तसाही कधी कळतच नाही, कारण तेवढी आमची बुद्धीमत्ता मुळातच नाही. मग ३ वर्षाच्या मुलाची बौद्धिक पातळी असलेले स्वघोषित मावळे, शिवाजी हा एक शब्द ओळखतात आणि महाराजांच्या शिकवणीला फाट्यावर मारून, महाराजांच्या नावावर राजकारण करायचा पोकळ विनोद सुरू करतात. बरं, अशा वागण्यानी आपण आपली लायकी दाखवून देतोय हे त्यांच्या लक्षात येत नाहीच. अर्थात हे कळण्यासाठीही नखाएवढी अक्कल लागतेच म्हणा!

यापूर्वीही केतकी चितळेने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यामहापरिनिर्वाण दिनाला उद्देशून एक पोस्ट फेसबुकवर शेअर केली होती. यावेळी तिच्या विरोधात बहुजन समाजाने पोलीस स्थानकात तक्रार सुद्धा नोंदवली होती. त्यामुळे फक्त प्रसिद्धीच्या झोकात राहण्यासाठी चितळे करत असलेला खटाटोप तिच्याच अंगलट येणार आहे असे जाणवते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here