बार्शीत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी परस्परविरोधी फिर्यादी, चौघांवर गुन्हा; वाहने ही जाळली

0
483

बार्शीत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी परस्परविरोधी फिर्यादी, चौघांवर गुन्हा; वाहने ही जाळली

बार्शी : शिवीगाळ केल्याच्या कारणावरून भांडण होवून परस्परविरोधी फिर्यादीवरून चौघांविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा बार्शी शहर पोलीसांत दाखल झाला आहे. याच प्रकरणात एकमेकांच्या गाड्या जाळल्याचे देखील फिर्यादीत म्हटले आहे.सोमवार दि. २१ रोजी रात्री पावणेअकराच्या सुमारास ही घटना घडली.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

नागेश सुभाष सुरवसे रा. गायकवाड पट्टी, ताडसौंदणे रोड, सुभाषनगर, बार्शी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. २१ रोजी रात्री पावणेअकराच्या सुमारास दादा गायकवाड रा रिंग रोड, सुभाषनगर बार्शी याने मला फोन करून घरी बोलावले. कृष्णा रजपूत यास शिव्या दिल्याबद्दल का सांगितले असे म्हणून मला जीवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यात बाटली फोडली व गंभीर जखमी केले. तसेच घाबरून त्याच्या घराबाहेर पळत असताना मला जीवे मारण्यासाठी दादा गायकवाड हा हातात तलवार घेवून माझे मागे धावत सुटला. त्यास मी न सापडल्याने मी त्याच्या घरासमोर लावलेली बुलेट ही रिंग रोड येथे नेवून जाळली अशा आशयाची तक्रार दिली आहे.

तर दादासाहेब बिभीषण गायकवाड रा. रिंग रोड, सुभाषनगर बार्शी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. २१ रोजी रात्री पावणेअकराच्या सुमारास नागेश सुरवसे रा. गायकवाड पट्टी, सुभाषनगर बार्शी, कृष्णा अनिल रजपूत रा. आझाद चौक बार्शी व एक तोंडाला बांधलेला अनोळखी व्यक्ती असे तिघे गायकवाड यांच्या घरी सुभाषनगर येथील घरी आले.

तिघांनी मिळून मी कृष्णा रजपूतला नागेश यांचे समोर शिवीगाळ केल्याचा राग मनात धरून मला शिवीगाळी करून जीवे मारण्याच्या उद्देशाने नागेश याने त्याचेजवळील काचेची बाटली माझे डोक्यात मारताना मी हालचाल केल्याने ती डावे कानास जोरात लागून जखमी झालो आहे. तसेच कृष्णा व अनोळखी व्यक्तीने मला मारा, याला जिवंत सोडू नका असे म्हणून शिवीगाळी केली.

तसेच कृष्णा याने त्याचे जवळील तलवार काढून मला मारताना माझे मित्राने व ड्रायव्हरने मध्ये येवून त्यास ढकलून दिल्याने व आरडाओरड केल्याने तिघेजण माझे घरातून पळून गेले. त्यानंतर दवाखान्यात उपचार घेत असताना सदर तिघांनी दि. २२ रोजीही माझे घरी जावून माझे फॉर्च्युनर, एम जे हेक्टर या गाड्याची सर्व काचाची तोडफोड करून दोन लाख रूपयांचे नुकसान केली आशयाची तक्रार दिली आहे. त्यावरून संबंधितांविरोधात बार्शी शहर पोलीसांत गुन्हा दाखल झाला आहे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here