सोलापूर : सोलापूर महानगरपालिका हद्दीत सोमवारी (ता. 10) शहरात 38 रुग्णांची भर पडली असून तिघांचा मृत्यू झाला आहे. ग्रामीण भागात दररोज तीन हजारांच्या सरासरीनुसार टेस्ट होत असतानाच शहरातील टेस्टची संख्या खूपच कमी झाली आहे. कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला, परंतु पूर्णपणे संपलेला नाही.

सोलापूर शहरातील 39 हजार 224 व्यक्तींची कोरोना टेस्ट आजवर करण्यात आली असून त्यामध्ये पाच हजार 460 व्यक्तींचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.

व्हीएमजीएमसी क्वॉर्टर, सिव्हिल क्वॉर्टर, राजस्व नगर, गुरुदेव दत्त नगर, एसआरपी कॅम्पमागे, रविवार पेठ, कुबेर चेंबर, कमला नगर, प्रल्हाद नगर, सदिच्छा नगर, नम्रता सोसायटी, आदित्य नगर (विजयपूर रोड), तुळजापूर वेस, उत्तर कसबा, सन्मित्र नगर, ओम नम:शिवाय नगर, थोबडे वस्ती, एसआरपी कॅम्प, कुमठे,

कुर्बान हुसेन नगर, बापूजी नगर, लक्ष्मी पेठ, गुरुवार पेठ, कोळी समाज सोसायटी, भागवत चाळ, गोविंद पार्क (जुळे सोलापूर), लक्ष्मी नगर (सोरेगाव), ईएसआय क्वॉर्टर, अंत्रोळीकर नगर, नितीन नगर (अक्कलकोट रोड), दक्षिण कसबा आणि वारद चाळ याठिकाणी आज नवे रुग्ण आढळले आहेत.
